शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

वेल्ह्याच्या सभापतींनी टोचली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करून घेण्याची गडबड करू नये, तसेच आपल्या पदाचा फायदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकारण्यांनी लसीकरण करून घेण्याची गडबड करू नये, तसेच आपल्या पदाचा फायदा घेऊ नये हे स्पष्ट केलेले असतानाच शासनाचा आदेश डावलून थेट पंचायत समितीच्या सभापतींनीच लसीकरण करून घेण्याचा प्रकार पुण्यात उघडकीला आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यांनी चक्क नोंदणी करून ही लस मिळवली आहे.

वेल्हा पंचायत समितीचे सभापती आणि काँग्रेस नेते दिनकर सरपाले यांनी हे लसीकरण करून घेतले आहे. पंचायत समितीमधील सर्व फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण संपल्याने आपल्यासह आणखी चारपाच जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही लस देण्यास मनाई केली असताना सभापतींना लस मिळाली कशी ? असा सवाल आता विचारला जातो आहे. याप्रकरणी आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. गंमत म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्यापूर्वीच वेल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापतींनी आपले लसीकरण करून घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे या लसीकरणाचे त्यांनी फोटोसेशनही करून घेतले आहे. याबाबत सरपाले म्हणाले, “आठ दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये माझ्याकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती. त्यानंतर मला एसएमएस आला आणि मग माझे लसीकरण करण्यात आले. मी एकट्याने नाही तर माझ्यासह आणखी तीन-चार जणांचेही लसीकरण झाले आहे.”

पण ही लस मिळाली कशी, हे विचारले असता सरपाले म्हणाले, “आमच्या इथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपले होते. त्यामुळे आमचे लसीकरण करण्यात आले. रितसर नोंदणी करून हे लसीकरण केले आहे. मी सभापती असल्याने हे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.

-------------

फोटो : वेल्हा पंचायत समितीत कोरोना लस घेताना वेल्हा पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले व त्यांचे कार्यकर्ते.