शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीमुळे भाज्या, फळे महाग

By admin | Updated: September 21, 2015 03:59 IST

मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत.

पिंपरी : मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. जुन्या कांद्याची विक्री ५५ ते ६०, तर नवीन कांदा ५० रुपये किलो असा दर आहे. गौरी-गणपतीमुळे सर्वच फळे महागली आहेत. पाच फळांचा वाटा ३० रुपयांना विक्री होत आहे. डाळिंब १०० ते १२० रुपये किलो, तर चिकू ७० रुपये किलोने विक्री सुरू आहे. पेरूस ६० ते ७० रुपये किलो इतका भाव आहे. सीताफळ ७० व संत्रीचे भाव ८० ते ९० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आवक कमी झाल्याने वाटाणा ३० ते ४० रुपयांनी महाग झाला आहे. १०० रुपये किलो असणारा वाटाणा या आठवड्यात १३० ते १४० रुपये किलो आहे. काकडीच्या भावातही १० रुपयांनी वाढ होऊन ३० रुपये किलो विक्री सुरू आहे. भेंडीच्या दरातही किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १० रुपये किलो असणारे टोमॅटो २० रुपये किलो झाले आहेत. आवक घटल्याने मेथी २०, तर कोथिंबीर दर २० ते २५ रुपये जुडी आहे. इतर पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. भाज्यांचे किलोसाठीचे दर (रुपयांत) : कांदा- ६०, बटाटा-१५, आले-५०, लसूण-६० ते ९०, वांगी-२०, टोमॅटो-२०, भेंडी-३०, गवार-३०, पावटा-३०, राजमा-३०, वालवर-४०, वाटाणा-१३० ते १४०, शेवगा-४०, चवळी-४०, घेवडा-५०, कोबी-३०, फ्लॉवर-५० ते ६०, मिरची-३०, ढोबळी मिरची-३०, कारले-४०, दोडका-४०, दुधी भोपळा-२०, डांग्या भोपळा-२०, तोंडली-४०, पडवळ-४०. (प्रतिनिधी)