शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांसह भाजीपाला पिकांना फटका

By admin | Updated: May 15, 2017 06:43 IST

वादळी वाऱ्यासोबत आलेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व हवेलीमध्ये शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : वादळी वाऱ्यासोबत आलेल्या पावसाने तालुक्याच्या पूर्व हवेलीमध्ये शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडले आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विद्युतवाहक तारा तुटल्या असून, विद्युत खांबही पडल्याने हवेलीच्या पूर्व भागातील अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला.लोणी काळभोरसह थेऊर, कोलवडी, मांजरी खुर्द, नायगाव, पेठ, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, वळती, तरडे, शिंदवणे, हिंगणगाव, अष्टापूर, भवरापूर या भागांमध्ये अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. गारांच्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून, डाळींब, शेवग्याची झाडे, केळीच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. रस्त्यालगतची अनेक झाडे पडल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतुकीला अडथळा झाला आहे. लोणी काळभोर, नायगाव, पेठ भागातील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या असून, फुलशेतीसह, फळबागा व पॉलिहाऊस व शेडनेटचे मोठे नुकसान झाल्याचे नायगावचे उपसरपंच राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी, दोडका, भोपळा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऊस, मका व वेलवर्गीय पिके भुईसपाट झाली आहेत. अनेक ठिकाणी पॉलीहाऊस व शेडनेटचेही मोठे नुकसान झाले आहे. पॉलीहाऊसचे कागद फाटून उडाले असून लोखंडी अँगल्स वाकडे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कुंजीरवाडी येथील युवा शेतकरी रामदास कुंजीर यांची पपईची दोनशे झाडे भुईसपाट झाली आहे. विजय कुंजीर, पांडुरंग कुंजीर, राघवदास चौधरी, संजय चौधरी, नंदकुमार चौधरी, दीपक चौधरी, किसन चौधरी, राजेंद्र हगवणे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोणी काळभोर येथील टाक्याचे माळ परिसरात वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजाच्या वस्तीला याचा सर्वांत जास्त फटका बसला असून येथील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याने त्यंचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. या ठिकाणी पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर व माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर यांनी भेट देऊन रहिवाशांची चौकशी केली.