शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथे विविध कार्यक्रम

By admin | Updated: February 14, 2017 01:31 IST

अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात मंगळवारी (दि. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंचर : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात मंगळवारी (दि. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभरानंतर आलेल्या या वर्षीच्या पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी होणार असून, त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.वडगाव काशिंबेग येथील अर्धपीठ गणपती देवस्थानात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मागील वर्षी एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नव्हती. वर्षभरानंतर या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. अर्धपीठ देवस्थानात पहाटे महापूजा, अभिषेक व आरती होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मंदिराच्या पायथ्यापासून एकेरी दर्शनरांग बॅरिकेड्स लावून बनविण्यात आली आहे.मंदिर परिसरात मंडप उभारण्यात आला असून दुपारच्या वेळी उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी मंडप दर्शनरांगेपर्यंत टाकण्यात आला. सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षकांबरोबर मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात असणार आहेत. सायंकाळी सर्वाधिक गर्दी होते. त्यामुळे वाहनांची पार्किंग बाजूला केली जाणार आहे. दुपारी व सायंकाळी महाआरती होईल. भाविकांना प्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.(वार्ताहर)