शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाईन डे’चे लोण ग्रामीण भागातही

By admin | Updated: February 15, 2017 01:54 IST

प्रेमाच्या नात्यातील ‘विश्वास’ अन् जवळीक निर्माण करणारा... जीवनात पदोपदी आनंदाची नवी पाऊलवाट फुलविणारा...

सोमेश्वरनगर : प्रेमाच्या नात्यातील ‘विश्वास’ अन् जवळीक निर्माण करणारा... जीवनात पदोपदी आनंदाची नवी पाऊलवाट फुलविणारा... अशा संदेशाद्वारे भावना व्यक्त करून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. आज दिवसभर सोशल मीडियावर भावना व्यक्त करणाऱ्या ‘मेसेज’च्या पोस्ट फिरत होत्या. शहरी भागापर्यंत मर्यादित असणाऱ्या या दिवसाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे.युवावर्गाने भेटवस्तू देण्यासाठी दुकानांमधून गर्दी केली होती. ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात सुरू होती. ग्रीटिंग कार्ड, विविध टेडी, दागिने, बुके, घड्याळे आदी भेटवस्तूंची खरेदी या वेळी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील मुलं-मुली संकुचित होत होती. मात्र आता ग्रामीण भागातील ‘व्हॅलेंटाईन डे’ची आज धमाल होती. प्रेमाचा संदेश देण्यासाठी आता ग्रामीण भागातील दुकानेही विविध वस्तंूनी गजबजली होती. ‘आय लव्ह यू’ बोलणारे, ‘मिस यू’ बोलणारे टेडी या टेडींना बाजारांमधून मागणी असल्याचे चित्र होते. ‘आयुष्य किती सुंदर आहे. हे समजून आले... तूच माझ्या जीवनाला प्रथम स्पर्श केलास... अन् मला पे्रमाचा अर्थ कळला, कसं सगळ््या नात्याहून निराळं जगावेगळं... अपूर्वाईनं भरलेलं अन् प्रेमाने फुललेलं आपलं नातं, तुझ्या प्रेमाने माझ्या आयुष्यात एक अतूट दिलासा दिला अशा विविध प्रकारचे लिखाण केलेल्या ‘ग्रीटिंग कार्ड’ला आज मागणी होती. यामध्ये मराठी ग्रीटिंग कार्डला विशेष मागणी दिली. या वर्षी सर्वांत जास्त ग्रीटिंग कार्ड व टेडी या दोन वस्तूंना जादा मागणी असल्याचे सोमेश्वरनगर येथील दुकानदार भारती जगताप यांनी सांगितले.