शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

लस पोहोचली; पण आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 27, 2015 01:21 IST

पेंटावॅलंट या पाच आजारांवर एकत्रित काम करणारी लस राज्य शासनाकडून पुणे महापालिकेकडे पोहोचली असून, अद्याप ती वापरण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत

 पुणे : पेंटावॅलंट या पाच आजारांवर एकत्रित काम करणारी लस राज्य शासनाकडून पुणे महापालिकेकडे पोहोचली असून, अद्याप ती वापरण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बालकांना या लशीसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सोमवारी राज्य आरोग्य विभागाकडून ही लस महापालिकेकडे आली आहे. त्याविषयी पालिकेच्या सर्व दवाखान्यांतील डॉक्टरांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. ३१ आॅक्टोबर रोजी पालिका दवाखान्यातील नर्सनाही या लशीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र अद्याप लस वापरण्यास कधीपासून सुरुवात करायची याबाबत कोणतीही ठोस माहिती राज्याकडून आलेली नसल्याचे पालिका लसीकरण अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जन्म झाल्यानंतर बाळ एक वर्षांचे होईपर्यंत होणारे विविध आजार व रोगांना प्रतिबंध करण्यासाठी बालकास दीड महिना, अडीच महिना व साडेतीन महिने असे तीन वेळा डोस देण्यासाठी नऊ वेळा इंजेक्शनची सुई टोचावी लागत होती. आता मात्र पाच रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी पेंटावॅलंट ही एकच लस देण्यात येणार आहे. पूर्वी धनुर्वात, घटसर्प व डांग्या खोकला यासाठी त्रिगुणी ही एकमेव लस देण्यात येत होती. तसेच हेपॅटायटीस बी ची वेगळी लस द्यावी लागत होती. या लशीत पूर्वीच्या चार ऐवजी पाच रोगप्रतिबंधकांचा समावेश असणार आहे. त्यात आता हिमोफिलस इन्फ्लुएंझा टाइप बी या आजाराच्या प्रतिबंधक लशीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. राज्य आरोग्य विभागाने याची प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहन सर्व आरोग्य संस्था, रुग्णालय व स्थानिक स्वराज्य संस्थांना केले आहे. बालमृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती व मातांना याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, हेपॅटायटीस बी आणि मेंदूज्वर (हिब) या आजारांपासून संरक्षण करणारी पेंटावॅलंट लस उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. मात्र प्रत्यक्ष वापर कधी होणार याबाबत साशंकता आहे. खासगी दवाखान्यांमध्ये ही लस मागील अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. मात्र राज्य शासनाने अशाप्रकारे आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना ही लस उपलब्ध करून दिल्याने लहानग्यांमधील आजारांचे आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाण कमी होईल अशी आशा आहे. - डॉ. शिशिर मोडक, बालरोगतज्ज्ञ