शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत लसीकरण या राजकारण्यांच्या थापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST

पुणे : ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, अशा थापा राजकारणी मारत आहेत. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे ही सोपी ...

पुणे : ‘डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल’, अशा थापा राजकारणी मारत आहेत. महिन्याला १५ कोटी डोसचे उत्पादन करणे ही सोपी गोष्ट नाही. उत्पादन १५ कोटींपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. दर वर्षी ११०-१२० कोटी डोस देण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे. इतर कंपन्यांच्या लसींचे उत्पादनही सुरू आहे. या सगळ्यांची आकडेमोड करून किती डोस उपलब्ध होऊ शकतात, हे मोजता येऊ शकेल, अशा शब्दांत सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संचालक डॉ. सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर डॉ. पूनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिरम इन्स्टिट्यूटतर्फे इतर सर्व लसींचे मिळून १० कोटींचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे, केवळ कोविशिल्डच्या १० कोटी लसींचे उत्पादन एका महिन्यात केले जात आहे. नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी आम्ही कोरोनावरील लसीला प्राधान्य देत आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अदर पूनावाला केवळ उन्हाळी सुट्ट्यांसाठी परदेशी गेले होते. धमक्या आल्यामुळे देश सोडावा लागला, असा विपर्यास केला, असेही पूनावाला यांनी नमूद केले.

पूनावाला म्हणाले, ‘मोदी सरकारने लसीच्या निर्यातीवर बंदी आणून अतिशय वाईट निर्णय घेतला आहे. मुलाने सांगितले होते की, यावर भाष्य करू नका, पण मी बोलणार आहे. सीरम जगातील १७० देशांना लसींचा पुरवठा करत आहे. त्या देशांनी आता कोरोनावरील लसीचीही मागणी केली आहे. त्यांनी कोट्यवधी रुपये आधीच दिले आहेत. बिल गेटस फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिले. मी त्यांना पैैसे परत देण्याची तयारी दाखवली, पण त्यांनी नकार दिला. एक-दोन महिन्यांमध्ये सरकारने निर्यातीला परवानगी दिल्यावर आम्हाला लस द्या, असे त्यांनी सांगितले आहे.’

-----------

तिसरा डोस घ्यावा लागेल

कोविशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटिबॉडी सहा महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर दोन महिने असले पाहिजे. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे मोदी सरकारने तीन महिन्यांच्या अंतराचा फतवा काढला आहे. कोरोना होऊन गेलेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी, असे सायरस पूनावाला म्हणाले.

------------------------------------

लॉकडाऊनची गरज नाही

लॉकडाऊनची गरज आहे, असे मला वाटत नाही. हर्ड इम्यनिटीमुळे लोकांना संरक्षण मिळू शकेल. कोरोनाचा मृत्यूदरही कमी आहे.

-----------

कॉकटेल डोस परिणामकारक नाही

कॉकटेल लसीला माझा विरोध आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस दिले आणि परिणामकारकता चांगली नसल्यास लस उत्पादक कंपन्या एकमेकांवर आरोप करतील. चाचण्यांमध्ये कॉकटेलची उपयुक्तता सिद्ध झालेली नाही.

-------------------------

कोरोनाच्या साथीचा परिणाम लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. सध्या शाळा आॅनलाईन सुरू आहेत, मुले घरी अभ्यास करू शकतात. शरद पवार साहेबांना विचारा की, मी कॉलेजच्या कँटिनमध्ये बसायचो, वर्गात जात नव्हतो. तरी सिरम इन्स्टिट्यूट उभे केले, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

--------------

तिस-या लाटेची तीव्रता कमी

हर्ड इम्युुनिटी आणि लसीकरणाच्या माध्यमातूनच साथीवर नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाची साथ जोपर्यंत जाणार नाही, तोवर लस घ्यावी लागणार आहे. तिसरी लाट तितकीशी तीव्र नसेल, कारण अनेकांना कोरोना होऊन गेला आणि अनेकांचे लसीकरणही झाले आहे.