शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST

पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधील बुधवार पेठेमधील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी पालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. ...

पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधील बुधवार पेठेमधील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी पालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या महिलांशी संवाद साधल्यानंतर पालिका प्रशासनाला याबाबत सूचना केली होती. त्यानंतर, पालिकेने तत्काळ लस उपलब्ध करुन देत लसीकरण सुरु केले.

पालिकेकडून हकमचंद नथूभाई गुजराथी शाळेमध्ये हे लसीकरण सुरु केले आहे. बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्या महिलांची संख्या आजमितीस साडेतीन हजारांपेक्षा अधिक आहे. या महिलांचा दररोज शेकडो नागरिकांसोबत संपर्क येत असतो. त्यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती कोरोनाबाधित आहे किंवा नाही याची माहिती नसल्याने कोरोनाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच या महिलांचे आरोग्यही महत्त्वाचे असल्याने त्यांचे लसीकरण होणे महत्त्वाचे असल्याचे गोऱ्हे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

सिंहगर्जना प्रतिष्ठानकडून यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. या ठिकाणी राहत असलेल्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक महिलांकडे पॅनकार्ड, आधारकार्ड अशी शासकीय कागदपत्र नाहीत. त्यामुळे त्यांचे लसीकरण कसे करायचे, असा प्रश्न होता. यामधून मार्ग काढत पालिकेकडून हे लसीकरण सुरु करण्यात आले. देहविक्रय करणाऱ्या महिलांकरिता पहिल्यांदाच लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.