शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाला संगणकीय प्रणालीचाच ठरतोय अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीसह ‘को-विन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीसह ‘को-विन अ‍ॅप’ मधील तांत्रिक अडचणींमुळे, पुणे शहरात १६ जानेवारीपासून १ मार्च २०२१ पर्यंत अपेक्षित लसीकरण न झाल्याने लसीकरणाचा टक्का घसल्याचे दिसून आले आहे़ आत्तापर्यंत एकूण आरोग्य सेवकांपैकी ६० टक्के जणांना तर, फ्रंटलाईन वर्कर्सपैकी सुमारे २५ टक्के जणांना लस देण्यात आली आहे़

दरम्यान, शासनाच्या नवीन आदेशानुसार महात्मा फुले आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांमध्येच लसीकरण होणार असल्याने लसीकरणाचा वेग आणखी मंदावला जाणार आहे़

कोरोना प्रतिबंधक लस देताना पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, दुसऱ्या टप्प्यात कोरोना आपत्तीत काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर्स) यांना, तर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांपुढील अन्य व्याधीग्रस्त व्यक्तींना लस देण्याचे नियोजन आहे़ मात्र या सर्वांना लसीकरणाच्या संगणकीय प्रणालीत नावनोंदणी करणे अत्यावश्यक आहे़

यापूर्वीच्या दोन टप्प्यांत नावनोंदणी केलेल्या व ‘को-विन अ‍ॅप’मध्ये नाव आलेल्यांनाच लसीकरणासाठी बोलविले जात आहे़ त्यातच अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी, नावनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचा नकार यामुळे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रारंभीचे लसीकरण अतिशय नगण्य होते़ तद्नंतर शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करून ही व्यवस्था २७ ठिकाणी कार्यरत झाली़ यामुळे लसीकरणाचा वेग वाढला गेला़ परंतु, नावनोंदणी केलेल्या ५६ हजार आरोग्यसेवकांपैकी आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ३८ हजार ७७३ जणांच लस दिली गेली़ तर नावनोंदणी केलेल्या ५७ हजार फ्र ंट लाईन वर्कर्स पैकी केवळ १६ हजार २० जणांनी लस घेतली आहे़

पुणे शहरात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १ मार्चपर्यंत ५४ हजार ९६३ जणांनाच आत्तापर्यंत लस देण्यात आली आहे़ तर १ मार्चपासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात पहिल्या दिवशी ६० वरील १५४ जणांना तर ४५ वर्षावरील अन्यव्याधीग्रस्त १६ व्यक्तींना लस देण्यात आली आहे़

---