शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाखालील जागांचा वापर सुरूच

By admin | Updated: June 27, 2017 07:57 IST

शहरातील उड्डाणपुलाखालच्या जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे दूर करून त्या जागा तातडीने खाली कराव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील उड्डाणपुलाखालच्या जागांवर करण्यात आलेली अतिक्रमणे दूर करून त्या जागा तातडीने खाली कराव्यात, असे निर्देश उच्च न्यायालयाने २००८ मध्ये दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर काही दिवस त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न पुणे महापालिकेकडून करण्यात आला, आता मात्र या आदेशाचाच महापालिकेला विसर पडला आहे.शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडून उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, तसेच काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपूल उभा राहिल्यानंतर त्याखालच्या रिकाम्या जागांवर बेवारस वाहने लावली जातात. त्याचबरोबर पथारी व्यावसायिकांकडूनही तिथे अतिक्रमण केले जाते. अनेक उड्डाणपुलाखालील जागांचा वापर अनधिकृतपणे सुरू आहे. या जागांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने त्या खाली करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेने सर्व उड्डाणपुलाखालच्या जागा ताब्यात घेऊन त्या बंदिस्त करणे आवश्यक होते. मात्र महापालिकेकडून तशी कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अनधिकृतपणे या जागांचा वापर सुरू आहे.  जागा व्यापल्या जाण्याबरोबरच त्याच्या गैरवापरामुळे त्या ठिकाणाला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. मुंढवा खराडी नदीच्या पुलाखाली तर अनधिकृतपणे गोवऱ्यांचा व्यवसाय सुरू आहे. उड्डाणपुलाखालच्या या बकालपणामुळे शहराचे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.नाशिक महापालिकेने शहरातील काही उड्डाणपुलाखालच्या जागांवर छोटे बगीचे विकसित केले आहेत, त्यामुळे उड्डाणपुलाखाली बकालपणाऐवजी सुशोभीकरण झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार महापालिकेने उड्डाणपुलाखालच्या जागा अतिक्रमणमुक्त करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे.