शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

‘माहिती अधिकार कायदा वापरा अन्यायाविरुद्ध’

By admin | Updated: March 30, 2015 05:32 IST

तुमच्यावर अन्याय होत असेल, तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करा व अन्याय दूर करा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास जंगम यांनी केले.

पिंपरी : तुमच्यावर अन्याय होत असेल, तर माहिती अधिकार कायद्याचा वापर करा व अन्याय दूर करा, असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास जंगम यांनी केले.कायद्याचा वापर लहानापासून वृद्धांपर्यंत करता येतो. एखादा अशिक्षित, अपंग, अंध असेल तर माहिती अधिकाऱ्याकडूनच अर्ज लिहून घेता येतो. महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर या कायद्याचा वापर करीत आहे. इंग्रजांनी १९२३ मध्ये सरकारी कामाबाबत गुप्ततेचा कायदा केला होता. त्यामुळे लोकांवर अन्याय होत होता. त्यासाठी अनेक वर्षे झगडून हा कायदा अमलात आणला. माहिती अधिकार कायद्याचा वापर सरकारी, निमसरकारी कार्यालये, तसेच ज्या संस्थांना सरकारकडून अनुदान मिळते, अशा ठिकाणी करता येतो. जर आपणावर अन्याय होत असेल, तर या कायद्याचा वापर करून अन्यायाचे निवारण करून घ्यावे, असे प्रतिपादन जंगम यांनी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित सभासद वाढदिवस सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन यादव यांनी माहिती अधिकार कायदा २००५ बाबत ज्येष्ठांना माहिती दिली. प्रमुख पाहुणे उद्योजक महादेव शेंडगे होते. प्रभारी अध्यक्षा उषा गर्भे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. रमेश डोंगरे, चंद्रकांत कोष्टी, चंद्रकांत पारखी, रमेश इनामदार, तुकाराम सपकाळ, नारायण दिवेकर, नारायण राहिंज, अविनाश भिडे, सूर्यकांत पारखी यांनी आयोजन केले. गोपाळ भसे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मुरडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)