शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपाल सबनीसांकडून दबावतंत्राचा वापर?

By admin | Updated: September 30, 2015 01:34 IST

पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले प्रा. श्रीपाल सबनीस यांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांचे प्रचारपत्रकावर फोटो आणि मजकूर प्रसिद्ध करून मतदारांवर दबाव टाकत आहेत. प्रा. सबनीस यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी अनिल कुलकर्णी यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केली आहे.तक्रार अर्जाची दखल घेऊन निर्वाचन अधिकाऱ्यांनी प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना तातडीने खुलासा करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. यासंदर्भात निर्वाचन अधिकारी उद्या (दि. ३०) निर्णय देणार आहेत.डॉ. वैद्य या जाणकार व अनुभवी आहेत. त्यांना निवडणुकीचे संकेत व रीतीरिवाज माहिती आहेत. त्या महामंडळाच्या अध्यक्षा असल्यामुळे कोणत्याही उमेदवाराचा जाहीर प्रचार करता येणार नाही, याची कल्पना त्यांना आहे. तथापि प्रा. सबनीस यांनी डॉ. वैद्य यांचा फोटो व काही मजकूर परस्पर व कोणाच्याही परवानगीशिवाय छापला असावा, असे कुलकर्णी यांच्या निवेदनात म्हटले आहे.असा प्रचार महामंडळाच्या नियमाला अनुसरून नाही. ही चूक प्रा. सबनीस पुन्हा पुन्हा करीत आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रा. सबनीस एक प्रकारचा दबाव टाकत आहेत व संभ्रम निर्माण करीत आहेत. त्यांनी परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती तातडीने कारवाई करून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.यासंदर्भात निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘कुलकर्णी यांचा तक्रार अर्ज मिळाला आहे. त्यानुसार प्रा. सबनीस आणि डॉ. वैद्य यांना नोटीस बजावण्यात आली आली असून मत मागविण्यात आले आहे. या तक्रार अर्जावर उद्या (दि. ३०) निर्णय घेण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)