शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसाचा प्रयोग आजपासून

By admin | Updated: September 16, 2015 02:48 IST

पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा

पुणे : पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पुण्यात कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग उपलब्ध असल्याने या प्रयोगाचा प्रारंभ बुधवारपासून (दि. १६) पुण्यातील लोहगाव विमानतळावरून होणार आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत हा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येईल. याबाबत विभागाचे प्रमुख सुहास दिवसे यांनी सांगितले, की मराठवाड्यात गेला महिनाभर हा प्रयोग सुरू होता. आता पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमान उड्डाणे करून हा कृत्रिम पाऊस पाडणार आहे. हे विमानतळ लष्कराचा हवाईतळ आहे. हवाईदल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या प्रयोगासाठी विमान उड्डाण व लँडिंगसाठी परवानगी दिली आहे. लोहगाव विमानतळावरून पश्चिम घाट क्षेत्रात पाऊस पाडण्याचे नियोजन आहे. धरणांतील कमी साठा व पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता पाणलोट क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. भीमा उपखोऱ्यात २५ धरणे असून, आजपर्यंत या धरणांत ८५़६४ टक्के पाणीसाठा आहे़ हा क्षमतेपेक्षा केवळ ४०़०६ टक्के आहे़ गतवर्षी तो ९७़८६ टक्के इतका होता़ कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला, तर त्यातून धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे़ मराठवाड्यात आॅगस्टच्या पहिल्या व शेवटच्या आठवड्यात केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला चांगले यश मिळाले असून, अनेक ठिकाणी पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत़ पश्चिम महाराष्ट्रात येत्या १८ सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस वाढणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे़ त्यामुळे पुणे व परिसरात होणाऱ्या या प्रयोगाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)