शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनमध्ये तीन दिवस कडकडीत बंद, ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:10 IST

उरुळी कांचन शहरात चालू ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर जाऊन पोहोचली आहे. तर मागील दोन-तीन दिवसांत ४७ च्या वर रुग्ण ...

उरुळी कांचन शहरात चालू ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर जाऊन पोहोचली आहे. तर मागील दोन-तीन दिवसांत ४७ च्या वर रुग्ण आढळल्याने शहरात संसर्ग धोका वाढला आहे. शहरातील आश्रमरस्ता, तुपेवस्ती व दत्तवाडी परिसरात रुग्णवाढीची स्थिती चिंताजनक बनली आहे. तसेच, या ठिकाणी रुग्ण बरे होऊन पुन्हा वाढत असल्याने रुग्णांची साखळी तुटत नसल्याने शहरात कोरोना वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

बैठकीत शहरात प्रतिबंधात्मक उपाय न पाळणाऱ्या, व्यक्ती व्यावसायिक यांच्यावर थेट गुन्हे दाखल करणे अथवा दंडात्मक कारवाई करून नियामनुसार दुकाने सील करण्याचे ठरले असून सार्वजनिक कार्यक्रमांवर शासन निर्देशानुसार ५० हून अधिक नागरिकांची उपस्थिती असल्यास कारवाई करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

उरुळी कांचन शहरात वाढत्या रुग्णसंख्येवर उपाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीच्या स्वरुपात बैठक गुरुवार ( दि.१८) ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या सभेच्या अध्यक्षस्थानी हवेलीचे ज्येष्ठ नेते प्रा.के.डी. कांचन होते.

ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बैठकीत आरोग्य विभागाच्या डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनावणे, दत्ता जांभळे, महसूलच्या वतीने तलाठी प्रदीप जवळकर, पोलिसांच्या वतीने महेंद्र गायकवाड, संदीप पवार, पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, अमित कांचन, मयूर कांचन,सुनिल तांबे,शंकर बडेकर, माजी सरपंच दत्तात्रय कांचन आदी उपस्थित होते. यावेळी या बैठकीत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने शहरात शनिवार (दि.२०) ते सोमवार (दि.२२) पर्यंत कडकडीत बंद, तर मंगळवार (दि.२३) ते शुक्रवार (दि.२६) पर्यंत व्यवहार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत चालू ठेऊन त्यानंतर बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

उरुळी कांचनमध्ये तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय जाहीर करताना जेष्ठ नेते प्रा.के.डी.कांचन.