पुणे विद्यापीठातील उर्दू पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार असून येत्या १३ ते २७ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेशासाठी शंभर गुणांची प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ३० असून तो एक वर्ष कालावधीचा आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाद्वारे उर्दू वाचन, उर्दू लेखन, उर्दू श्रवण आणि उर्दू संभाषण अशी चार कौशल्य शिकता येणार आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पदवी, पदव्युत्तर, एमपीएल, पीएच.डीचे विद्यार्थी पात्र आहेत,असे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे.
विद्यापीठात उर्दू भाषेचा अभ्यासक्र सुरू करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यासाठी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले यांच्या अध्यक्षतेसाठी समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशी नुसार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.