शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅक’मुळे विद्यापीठ चकाचक

By admin | Updated: January 22, 2017 04:58 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा परिसर चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा परिसर चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शैक्षणिक माहितीबरोबरच विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांना नॅक समितीकडून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यापीठाचा परिसर नीटनेटका करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.नॅक समितीकडून येत्या २३ ते २५ जानेवारी या कालावधीत विद्यापीठाची तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक माहिती जमा करण्यास; तसेच विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समितीच्या सदस्यांसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व इतर अधिकारी सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर समितीकडून विद्यापीठातील विविध विभागांना भेटी दिल्या जातील. समितीकडून पायाभूत सुविधा, संशोधनाचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती आदी बाबींची तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने नॅक समितीसाठी लागणारी सर्व माहिती तयार करून ठेवली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी तसेच विद्यापीठाबाहेरील अधिकाऱ्यांनी तपासणीची ‘रंगीत तालीम’ केली आहे.विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच ते मुख्य इमारतीपर्यंतचा परिसर स्वच्छ केला जात आहे. नॅकमुळे रविवारी सुद्धा विद्यापीठाचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच, सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाकडे तयारीसाठी काही तास उरलेला असल्याने विद्यापीठाचे अधिकारी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यालगतच्या झाडांना, तसेच विद्यापीठातील इमारतींच्या भिंतींना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच, सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी फुलांच्या कुंड्या ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)समितीचे सदस्य विद्यापीठातच मुक्कामी विद्यापीठाकडून पूर्वी नॅक समितीतील सदस्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली होती. मात्र, येत्या २३ ते २५ जानेवारी या कालावधीत नॅक समितीतील सर्व सदस्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्येच राहणार आहेत.