शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या नगर, नाशिक उपकेंद्राचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडून नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात ...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडून नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, राज्य शासनाने या केंद्रांना ‌‌अधिकृत मान्यता दिली. विद्यापीठ प्रशासनानेही येथे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आकृतीबंध तयार केला आहे. त्यामुळे या केंद्राच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला उशिरा का होईना, सुरुवात झाली आहे.

गेली अनेक वर्षे विद्यपीठाची उपकेंद्र शासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षित होती. मात्र, शासनाची मान्यता मिळाल्यामुळे येथे विविध कामे हाती घेण्यास विद्यापीठ प्रशासनाने सुरुवात केली आहे. विद्यापीठास मंजूर असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधातून उपकेंद्राला मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे, तसेच चतुर्थश्रेणीतील पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्याचा विचार करून विद्यापीठाने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी तात्पुरती तरतूद केली आहे.

सध्या या दोन्ही उपकेंद्राच्या ठिकाणी लेखा व सर्वसाधारण विभागसाठी प्रत्येक कक्षाधिकारी, सहायक कक्षाधिकारी, वरिष्ठ सहायक ४ आणि कनिष्ठ सहायक २ अशा एकूण १० पदनामांची तरतूद केली आहे. प्रत्येक केंद्रास प्रत्येकी ५ याप्रमाणे हे मनुष्य बळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठातील उपलब्ध असलेल्या शासनमान्य पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी आवश्‍यकतेनुसार, नाशिक व नगर उपकेंद्रासाठी अधिकारी व सेवक नियुक्त करण्याची प्रक्रिया विद्यापीठाने सुरू केली असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. शासनानेच या केंद्रांना मान्यता दिल्याने, उपकेंद्राच्या ठिकाणी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत.

--

विद्यापीठात येणाऱ्यांची संख्या कमी होणार

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयातील व विद्यार्थ्यांच्या अडचणी, शंका उपकेंद्रावर सोडविणे अपेक्षित आहे. मात्र, उपकेंद्रावर मनुष्यबळ नसल्याने सर्वच कामांसाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यावे लागत होते, परंतु आता उपकेंद्राच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नियुक्‍त होणार असल्याने विद्यापीठात येणाऱ्यांची संख्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.