शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कायदा सुधार समितीने मागितली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:10 IST

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ कायद्यात कोणते बदल करावेत, ऑनलाइन परीक्षासंदर्भात कोणती तरतूद करावी, इतर विद्यापीठांमधील चांगल्या गोष्टींचा ...

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ कायद्यात कोणते बदल करावेत, ऑनलाइन परीक्षासंदर्भात कोणती तरतूद करावी, इतर विद्यापीठांमधील चांगल्या गोष्टींचा समावेश त्यात कसा करावा आदी बाबींचा अभ्यास उच्च शिक्षण विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समित्यातर्फे केला जात आहे. मात्र,या समित्याचा अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समितीसह इतर समित्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती शासनाकडे करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह व नवीन शैक्षणिक धोरण आणि यांना अनुसरून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांची समिती उच्चशिक्षण विभागाने स्थापन केली. या समितीमध्ये विविध विद्यापीठांच्या आजी- माजी कुलगुरूंसह कायदे अभ्यासक व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ हे सदस्य, तर उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. विद्यापीठ कायद्यातील सुधारणांच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर सेवक, विविध संघटना यांच्याकडून सूचना स्वीकारण्यात आल्या. तसेच राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्या लागल्या. मात्र, विद्यापीठ कायद्यात ऑनलाइन परीक्षासंदर्भात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे विद्यापीठ कायद्यात बदल करताना ऑनलाइन परीक्षांचा अंतर्भाव केला जाणार आहे. तसेच विद्यापीठ कायद्यात सुधारणा करताना विद्यापीठ अनुदान आयोगाची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे यांचाही विचार होणार आहे. शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीबरोबरच उपसमित्यांच्या बैठकासुद्धा घेण्यात आल्या आहेत. त्यातील काही समित्यांचे काम पूर्ण झाले असून कोरोनामुळे इतर समित्यांना काम करणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने या समित्यांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

----------

विद्यापीठ कायद्यातील सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या समित्यांना राज्य शासनाकडे मुदतवाढीबाबत पत्रव्यवहार केला आहे,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सांगितले. तसेच समितीच्या अहवालाचे काम चांगले झाले असून लवकरच तो पूर्ण होईल, असे सुखदेव थोरात यांनी स्पष्ट केले.