शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणार्‍या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्यात

By admin | Updated: May 22, 2014 06:12 IST

वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे कॉलनी भागातील महावितरण कंपनीच्या वाहिन्यांमुळे परिसरात अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सर्व विद्युतवाहिन्या भूमिगत

किवळे : वाल्हेकरवाडी येथील चिंचवडे कॉलनी भागातील महावितरण कंपनीच्या वाहिन्यांमुळे परिसरात अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सर्व विद्युतवाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी चिंतामणी चौकात बुधवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. महावितरणचे पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता इ. अ. मुलाणी यांनी सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे पत्र दिल्याने उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण दुपारी चारच्या सुमारास सोडले. वाल्हेकरवाडीतील चिंचवडे कॉलनी क्रमांक एक , दोन व तीन या भागात महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्या अनेक घरांवर तसेच विविध रस्त्यालगत लोंबकळत असल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. यासंदर्भात महावितरण अधिकार्‍यांना वारंवार निवेदन देऊन सर्व वाहिन्या भूमिगत करण्याबाबत निदर्शनास आणले होते. मात्र कंपनीकडून चालढकल होत असल्याने बुधवारी सकाळपासून वाल्हेकरवाडीतील चिंतामणी मंदिरानजीकच्या चौकात नगरसेविका संगिता भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु केले. उपोषणाची दखल घेऊन सकाळी अकराच्या सुमारास महावितरणच्या काही स्थानिक अधिकार्‍यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र उपोषणकर्ते ठाम राहिल्याने दुपारी चारच्या सुमारास पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता मुलाणी यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांनी भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळालेली असून, महावितरणच्या मंजूर प्रकल्पातील लघुदाब वाहिनी भूमिगत करण्यासाठी प्राधान्याने आगामी तीन महिन्यात काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले. या वेळी उपकार्यकारी अभियंता संजय पोळ, शाखा अभियंता पवार उपस्थित होते. उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते रामदास केंदळे, तसेच महिला व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने बसले होते. दिवसभरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, एच. बी. ननावरे, पाटीलबुवा चिंचवडे, खंडू चिंचवडे, शिरीष कर्णिक आदींनी भेटून उपोषणाला पाठिंबा दिला. (वार्ताहर)