शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत फ्लेक्समुळे वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:14 IST

थेऊर : फाटा येथील थेऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या डिव्हायडरवर लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे तेथील वाहतुकीस अडथळा होत आहे. श्रीक्षेत्र ...

थेऊर : फाटा येथील थेऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या डिव्हायडरवर लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे तेथील वाहतुकीस अडथळा होत आहे.

श्रीक्षेत्र थेऊर अष्टविनायकपैकी एक असलेले क्षेत्र आहे. तसेच हा रस्ता सोलापूर महामार्ग व नगर महामार्ग यांना जोडणारा दुवा असल्याने खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर रहदारी असते. थेऊरकडे जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था आधीच बिकट आहे. त्यामुळे अनेक अपघात या मार्गावर झालेले आहेत. त्यातच महामार्गावर येताच या अनधिकृत फ्लेक्समुळे पुण्याच्या दिशेने येणाऱ्या गाड्या दिसत नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध येऊन थांबावे लागत असून त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. विशेष म्हणजे लोणी काळभोरचे ट्रॅफिक पोलीस या चौकात (गाड्या अडविण्यासाठी) उभे असतात. परंतु ज्यामुळे अपघात होत आहेत असे जाहिरात फलक त्यांना दिसत नसल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. अनेक कर्मचारी त्या चौकात न थांबता थेऊर रस्त्याला जाऊन कार्यवाही करत असल्याचे दिसत आहे. परंतु सर्वसामान्यांना त्रास होणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सवर मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.