ऑनलाइन टीम
पुणे, दि. १० - पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनजवळ गुरूवारी दुपारी झालेल्या दुचाकीच्या स्फोटात २ जण किरकोळ जखमी झाले. पोलिस स्टेशनसमोरच्या पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीचा स्फोट झाल्याने इतर काही वाहनांचेही नुकसान झाले. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर हा स्फोट झाला असून परिसराची सुरक्षा वाढवण्याच आली आहे. बॉम्ब शोधक पथक तसेच एटीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.