शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नवले पुलाजवळ ट्रेलरने ८ वाहनांना उडविलेदोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे( वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे ( वय ३२, रा. ...

या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे( वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे ( वय ३२, रा. उस्मानाबाद) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी जखमी असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास २२ चाकी ट्रेलर सातारा बाजूकडून ४१ टन लोखंड घेऊन मुंबई बाजूकडे जात होता. भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे चाललेल्या ८ वाहनांना एका पाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. तसेच त्यानंतर ट्रेलरची पुलावरील कठड्याला धडक बसल्याने ट्रेलर ने पेट घेतला. याबाबतची माहिती मिळताच पीएमआरडी व पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रेलरने धडक दिल्याने रिक्षाचालक बाहेर पडले. तेव्हा बाजूने जाणार्या वाहनांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात कारमधील अनेक जण अडकून पडले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलर चालक प्रेमराज बिष्णोई ( वय २५, रा. जोधपूर, राजस्थान) याला नागरिकांनी पकडून जोरदार मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची खबर मिळताच घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस व सिंहगड वाहतूक विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचून मदत कार्य केले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर सहा किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरा पर्यंत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.