शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरमध्ये सुरू होणार ऑक्सिजनचे दोन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST

शिरुर-हवेलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज सुमारे ३०० पेक्षाही जास्त ऑक्सिजन सिलिंडरची गरज पूर्ण कशी करायची? या विवंचनेत लोकप्रतिनिधी ...

शिरुर-हवेलीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दररोज सुमारे ३०० पेक्षाही जास्त ऑक्सिजन सिलिंडरची गरज पूर्ण कशी करायची? या विवंचनेत लोकप्रतिनिधी व प्रशासन होते. यावर तातडीचा पर्याय म्हणून सणसवाडी (ता. शिरूर) येथील चिन्मय ऑक्सिजन प्रायव्हेट लिमिटेड हा लिक्विड ऑक्सिजन सिलेंडरचा रिफिलिंग प्लॅट तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सी-एअर (Oxy-Air) नॅचरल रिसोर्सेस हा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लॅटला प्रशासनाच्या मदतीने तातडीने वीजपुरवठा तसेच उत्पादन लवकर सुरु करण्यासाठी शिरुर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील चिन्मय ऑक्सिजन या लिक्विड ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग करणारा प्लॅट, ऑक्सिजन टँकरचा पुरवठ्याअभावी बंद होता. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या मागणीनुसार आमदार अशोक पवार हे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्त एस. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. अखेर आयुक्त एस. बी. पाटील यांनी या प्लँटला नव्याने परवानगी देत पाच टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास मान्यता दिली असून, आज पुरवठा झाल्यास उद्या या प्लॅटमधून शिरुर-हवेलीतील ३२ रुग्णालयांचा किमान २५० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होऊन रुग्णालये तसेच रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सी-एअर नॅचरल रिसोर्सेस हा हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लँटही आठवडाभराच्या आतच सुरु होणार असून प्रतिदिन सुमारे ८ टन क्षमतेच्या या प्लँटमुळे शिरुर-हवेलीतील जवळपास सर्वच रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊ शकणार असून भेदभाव न करता इतरांनाही ऑक्सिजनची मदत करणे शक्य होणार असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.

ऑक्सिजनअभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, यासाठी सणसवाडी तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन प्लँटसाठी केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्याला यश येऊन सणसवाडीच्या प्लँटमधून उद्यापर्यंत तर रांजणगाव वसाहतीच्या प्लँटमधून चार-पाच दिवसांत उत्पादन प्रक्रिया सुरु होईल. जेणेकरून पुढे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल.

दरम्यान, प्राथमिक स्तरावरील रुग्णांना ऑक्सिजनसाठी उपयोगी असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनही मतदारसंघातील महत्त्वाच्या कोविड रुग्णालयांना देण्यात आले आहे. विमानातील आपत्कालीन ऑक्सिजन यंत्रणा तसेच साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चाचपणी व पाठपुरावा सुरु आहे.

ॲड. अशोक पवार, आमदार, शिरुर-हवेली

सध्या शिरुरमधील रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी दररोज वाढत असून पुरेशा पुरवठ्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सणसवाडी व रांजणगावचे नवे ऑक्सिजन प्लँट पूर्ण क्षमतेने चालल्यास नियमित पुरवठा होऊन कोणताही रुग्ण ऑक्सिजनअभावी दगावणार नाही.

संतोषकुमार देशमुख, प्रांताधिक़ारी, शिरूर, पुणे.