शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीनेच अपहरण केलेल्या दोन मुलींची सुटका

By admin | Updated: June 22, 2017 07:18 IST

शहरातून अपहरण झालेल्या दोन मुलींची पोलिसांनी दोन दिवसांत सुटका करण्यात यश मिळविले. पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी प्रसंगावधान राखून पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर : शहरातून अपहरण झालेल्या दोन मुलींची पोलिसांनी दोन दिवसांत सुटका करण्यात यश मिळविले. पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे यांनी प्रसंगावधान राखून पाठलाग करून अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. अपहरण करणारी या दोन मुलींची मैत्रीणच असल्याचे मुलींच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. वृषाली दुडे (रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) व सचिन आगवणे (रा. मूळ बारामती) अशी अपहरणकर्त्यांची नावे आहेत. पूजा आगरवाल व कविता तीखारती या महिलांनी १६ जून रोजी मुलींच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. यात वृषाली दुडे हिच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक होडगे यांच्याकडे तपास होता. १७ जून रोजी पूजा आगरवाल यांना सचिन आगवणे याचा कॉल आला. ‘तुमच्या मुलीच गाठ घ्यायची असेल, तर तुम्ही बाह्यवळण मार्गावर या. तिची इच्छा असेल तर सोबत घेऊन जा,’ असे आगवणे याने आगरवाल यांना सांगितले. हा फोन सुरू असताना आगरवाल या सामाजिक कार्यकर्ते प्रताप थोरात यांच्या कार्यालयात होत्या. थोरात यांनी उपनिरीक्षक होडगे यांच्याशी संपर्क साधला. यावर होडगे दोन पोलीस शिपायांसह साध्या वेशात बाह्यवळण मार्गावर गेल्या. त्या वेळी थोरात तसेच जयवंत साळुंके हेदेखील त्यांच्यासमवेत होते. मात्र आगवणे तेथून पळाला. बस स्थानकात शोध घेतला असता वृषाली व सचिन दोघेही तेथे मिळून आले. पोलिसी हिसका दाखविल्यावर मुलींना एसटीत बसवून शिरूरच्या दिशेने पाठविल्याचे वृषालीने सांगितले. यानंतर मुलींनी दिलेल्या जबाबावरून वृषाली व सचिन आगवणे यांच्यावर फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यात सचिनचा जामीन झाला.