शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत सापडल्या दोन दुचाकी

By admin | Updated: October 14, 2016 05:09 IST

आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील शिवसंगम डेव्हलपर्सच्या जागेत असणाऱ्या विहिरीमध्ये दोन दुचाकी ग्रामस्थांना सापडल्या आहे. ग्रामस्थांनी दोन्ही दुचाकी बाहेर

वाघोली : आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील शिवसंगम डेव्हलपर्सच्या जागेत असणाऱ्या विहिरीमध्ये दोन दुचाकी ग्रामस्थांना सापडल्या आहे. ग्रामस्थांनी दोन्ही दुचाकी बाहेर काढल्यानंतर एक गाडी आव्हाळवाडी येथीलच असल्याचे समोर आले तर दुसऱ्या दुचाकीच्या मालकाचा तपास अद्यापही लागलेला नाही.याबाबतीत माहिती अशी, की वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यालगत विठाई वेअरहाऊसच्या समोर असणाऱ्या शिवसंगम डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेमध्ये एक विहीर आहे. सकाळी विहिरीचे मालक तुकाराम आव्हाळे यांनी रात्रभर मोटारीच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसले होते. सकाळी विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने मोटर बंद करण्यासाठी आलेल्या आव्हाळे यांना विहिरीमध्ये पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ काही ग्रामस्थांना बोलावून दोरीच्या साह्याने दुचाकी वर काढली. एक दुचाकी काढल्यानंतर आणखी एक काळ््या रंगाची दुचाकी दिसली. दुसरी दुचाकीदेखील गळाच्या सहायाने तरुणांनी वर काढली. या वेळी विहिरीभोवती बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. संपूर्ण आव्हाळवाडी रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. परंतु शिंदे यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. विहिरीत दोन गाड्या सापडल्याचे समजल्यानंतर याठिकाणी ग्रामस्थांनी एकाच गर्दी केली होती. दुचाकी सापडल्यामुळे जीवितहानी झाली आहे की नाही याचा शोधही ग्रामस्थांनी घेतला परंतु तसे काही आढळून आले नाही. विहिरीत दुचाकी सापडल्याचे आश्चर्य वाघोली, आव्हाळवाडीसह परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)