शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता मागणा-या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:08 IST

पुणे : पत्रकार असल्याचे ओळखपत्र गळ्यात घालून आम्ही गुन्हेविषयक बातमीदार असल्याचे सांगून परमिट रूमचालकाकडे हप्ता मागणा-या तोतया महिला पत्रकारासह ...

पुणे : पत्रकार असल्याचे ओळखपत्र गळ्यात घालून आम्ही गुन्हेविषयक बातमीदार असल्याचे सांगून परमिट रूमचालकाकडे हप्ता मागणा-या तोतया महिला पत्रकारासह दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

हाजलिना प्रमोद जयस्वाल (वय ३५, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय ५७, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३० वर्षांच्या परमिट रूमचालकाने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांचे सेवन लव्हज चौक येथे इंप्रेस सेव्हन लव्हज परमिट रूम आहे. त्यांच्याकडे हाजलिना जयस्वाल व सतपाल बग्गा हे शनिवारी आले होते. त्यांनी गळ्यात सीसीटी क्राईम चेक टाईम्स या नावाच्या वृत्तसंस्थेची पत्रकार असल्याचे ओळखपत्र घातले होते. त्यांनी आम्ही गुन्हे बातमीदार असून तुम्ही बेकायदा दारू विक्री करीत आहात. लोकांना परमिटरूममध्ये मद्यपानाची परवानगी देता. तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तुमच्या मालकांना आमचे पथक बोलवत आहे, असे सांगितले. त्यानंतर ते एक हजार रुपये घेऊन निघून गेले. केस करायची नसेल तर जादा ५ हजार रुपये द्यावे लागतील, असे त्यांनी फोन करून सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी खडक पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादीने त्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविली. शनिवारी दुपारी ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले की, हे दोघांकडील ओळखपत्र बनावट असल्याचे दिसत आहे. ते आपण प्रेस सीसीटी क्राईम चेक टाईम्सचे पत्रकार असून ते दिल्लीत नोंदणीकृत असल्याचे सांगतात. याबाबत खात्री करण्यात येत आहे.