तळेगाव दाभाडे : दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळयातील अडीच तोळ्याची ६५ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. ही घटना तळेगाव स्टेशन येथील नाना भालेराव कॉलनीत गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या संदर्भात शैलजा जॉईस ब्रीग्ज (वय ६२, रा. सरवेश अपार्टमेंट, नाना भालेराव कॉलनी. तळेगाव स्टेशन) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाजारातून आपल्या पतीसह घरी परतत असताना काळया रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ऐवज घेवून पोबारा केला. (वार्ताहर)
अडीच तोळ्यांची सोनसाखळी हिसकावली
By admin | Updated: May 30, 2014 05:04 IST