शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीस धरणे शंभर टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जवळपास महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती. मागील आठवडाभरापासून पुन्हा पावसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जवळपास महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती. मागील आठवडाभरापासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रमुख २६ धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषत: मुठा खोरे (खडकवासला प्रकल्प), नीरा खोरे शंभर टक्के भरले आहे. कुकडी प्रकल्पातील धरणांत ७६.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पुणे शहर आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात (मुठा खोरे) ९९.८४ टक्के (२९.११ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २६ पैकी २० धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याचबरोबर नीरा खोऱ्यात देखील १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, तर नाझरे धरणांत २६.३५ टक्के पाणी जमा झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच खेड तालुक्याच्या काही भागासह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी कुकडी प्रकल्पातील आवर्तन अत्यंत उपयुक्त असते. कुकडीच्या पाण्यामुळे या तालुक्यातील शेतकरी विविध पिके घेत असतो. मात्र, जवळपास दीड महिना कुकडी प्रकल्प क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी काहीसा चिंताग्रस्त झाला होता. मात्र, मागील आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा २० टक्क्यांनी वाढला आहे. ५६ टक्क्यांवरून आता ७६.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

चौकट

‘उजनी’तील साठा पोहोचला ८३ टक्क्यांवर

पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग, तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात बुधवारी (दि. २२) सकाळी ८ वाजेपर्यंत ८३.१० टक्के (४४.५२ टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. मागील आठवड्यापासून मुठा आणि भीमा खोऱ्यात पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणात पुन्हा पाणीसाठा येण्यास सुरुवात झाली आहे. ८ ऑगस्टला ६१ टक्के पाणीसाठा होता. आता तो ८३.१० टक्क्यांवर पोहोचला आहे.

चौकट

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची माहिती

धरण - प्रकल्प साठा (टीएमसी) - सध्याचा साठा --टक्केवारी

टेमघर ३.७१ ३.७१ १००

वरसगाव १२.८२ १२.८२ १००

पानशेत १०.६५ १०.६५ १००

खडकवासला १.९७ १.९३ ९७.६०

पवना ८.५१ ८.५१ १००

कासारसाई ०.५७ ०.५६ ९९.५६

मुळशी २०.१६ १९.३९ ९६.१७

कळमोडी १.५१ १.५१ १००

चासकमान ७.५८ ७.५८ १००

भामा आसखेड ७.६७ ७.६७ १००

आंध्रा २.९२ २.९२ १००

वडीवळे १.०७ १.०७ १००

शेटफळ ०.६० ०.०८ १३.२८

गुंजवणी ३.६९ ३.६९ १००

भाटघर २३.५० २३.५० १००

नीरा देवघर ११.७३ ११.७३ १००

वीर ९.४१ ९.४१ १००

नाझरे ०.५९ ०.१५ २६.३५

पिंपळगाव जोगे ३.८९ २.२६ ५८.१३

माणिकडोह १०.१७ ६.०१ ५९.०६

येडगाव २.८० १.५२ ७८.४४

वडज १.१७ १.१७ १००

डिंभे १२.४९ १२.५० १००

चिल्हेवाडी ०.९६ ०.८० १००

घोड ५.४७ २.८४ ५८.२७

विसापूर ०.९० ०.०७ ७.८५

उजनी ५३.५७ ४४.५२ ८३.१०