शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बारा वर्षांच्या मुलीने लांबविले सात लाखांचे दागिने

By admin | Updated: October 27, 2014 08:58 IST

येथील भर चौकात असलेल्या सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकरांनी दुकानातील सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

तळेगाव दाभाडे : येथील भर चौकात असलेल्या सराफी दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या माय-लेकरांनी दुकानातील सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी एका १२ वर्षांच्या लहान मुलीने अवघ्याकाही मिनिटांत केली. विशेष म्हणजे त्या मुलीची ही हातचलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील धनराज ज्वेलर्स या दुकानात १८ आॅक्टोबरला दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडली. समीर धनराज ओसवाल (वय ३७, रा. सोमवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुकानातील दागिन्यांची मोजणी करताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी बुधवारी (दि. २२) फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांचे राजेंद्र चौकामध्ये धनराज ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. शनिवारी दुपारी एक महिला तेथे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिच्या सोबत तिचा मुलगा आणि बारा वर्षांची मुलगीही आली होती. दिवाळीचा सण असल्यामुळे दुकानामध्ये दागिने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. त्या वेळी दुकानामध्ये समीर एकटेच होते. या मायलेकरांनी गर्दीचा फायदा घेऊन दुकानातील सोन्याचे दागिने पळवले.समीर यांनी महिलेला सोन्याचे दागिने दाखवले. त्यांनीही दागिने बघण्याचे नाटक केले. समीर दुसऱ्या ग्राहकास दागिने दाखवत असताना त्यांची नजर चुकवून या महिलेची मुलगी काऊंटर खालून आत गेली. आतील बाजूस असलेल्या खोलीच्या उघड्या दरवाजातून ही मुलगी आत गेली. खोलीमध्ये सोने ठेवण्यासाठी असलेल्या तिजोरीचा दरवाजा उघडून आतील दागिने एका कपड्यात गुंडाळून घेतले. मुलीने चोरलेले दागिने मुलीने बाहेर येऊन आईकडे दिले. या महिलेने ते दागिने पर्समध्ये ठेवून दागिने पाहण्याचा बहाणा सुरूच ठेवला. थोड्या वेळाने महिला आणि तिची मुले दुकानातून निघून गेली. दुकानामध्ये गर्दी असल्यामुळे समीर यांना त्या वेळी चोरीचा संशयही आला नाही. समीर यांनी नंतर दुकानातील दागिन्यांची मोजणी केली. त्या वेळी त्यांना सोन्याचे दागिने कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बारा वर्षांच्या मुलीने तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे लक्षात आले. समीर यांनी दुकानातील असलेल्या दागिन्यांची आणि विक्री केलेल्या दागिन्यांची तपासणी केली. (वार्ताहर)