शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिकवण्या उदंड जाहल्या..!

By admin | Updated: June 19, 2014 05:14 IST

स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात.

पुणे : स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी पालक चांगल्या शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेतात. मात्र, तरीही अनेक पालक मुलांना खासगी शिकवणीत पाठवीत असल्याचे चित्र आहे. बऱ्याचशा पालकांना मुलांचा अभ्यास घ्यायलाच वेळ मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. मुलांचा घरी अभ्यासच होत नाही, असेही या पालकांनी कबूल केले आहे. मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे वाढते प्रमाण पालकवर्गात दिसत आहे. चांगली शाळा त्याचबरोबर चांगली शिकवणीची निवड करण्यातही पालकांची कसरत पाहायला मिळत आहे. शाळा सुरू झाल्या, की खासगी शिकवण्यांसाठी पालकांची धावपळ सुरू होते. चांगली शाळा निवडण्याबरोबरच चांगली शिकवणी मिळविण्यासाठीही धडपड केली जाते. खासगी शिकवणींचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुलांना खासगी शिकवणी लावण्याचे प्रमाण व त्याची कारणे शोधण्यासाठी ‘लोकमत’ने सर्व्हेक्षण केला. यामध्ये विविध भागांतील काही पालकांची मते जाणून घेण्यात आली. या सर्वेक्षणानुसार शहरातील जवळपास ८२ टक्के पालकांनी आपली मुले खासगी शिकवणीला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील खासगी शिकवणीचालकांना सध्या चांगलाच भाव मिळत असल्याचे दिसून येते. मुलांना खासगी शिकवणी का लावली,या प्रश्नाचे उत्तर देताना तब्बल ४५ टक्के पालकांनी मुलांचा घरी अभ्यास होत नसल्याचे स्पष्ट केले. तर २२ टक्के पालकांना अभ्यास घेण्यास वेळ मिळत नाही. मुलांचा घरी अभ्यास होत नाही, हेही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे पूर्ण वेळ देता येत नाही, याचेच चिन्ह आहे. त्यामुळे दोन्हींचा विचार केल्यास एकूण तब्बल ६७ टक्के पालक मुलांच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे ११ टक्के पालकांनी शाळेत व्यवस्थित शिकवत नसल्याचेही कारण दिले आहे. हाही पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. काही पालकांनी शाळेव्यतिरिक्त मुलांचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी शिकवणी लावल्याचे स्पष्ट केले. तसेच, बदलेला अभ्यासक्रम कठीण असल्याने शिकवणीला टाकल्याचे पालकांनी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांत अभ्यासक्रमात बरेचसे बदल झाल्याने त्या बदलत्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे कठीण असल्याने पालक मुलांसाठी शिकवणी हा पर्याय निवडताना आढळून आले. मुले आपले ऐकत नाहीत, असे सांगणारे पालकही या सर्व्हेक्षणानिमित्ताने पुढे आले आहेत.(प्रतिनिधी)