शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जनजागृतीसाठी मंगळवारी रॅली

By admin | Updated: August 28, 2016 04:20 IST

अवयवदानातून पीडितांची जीवनज्योत फुलविण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने ३० आॅगस्ट रोजी

पुणे : अवयवदानातून पीडितांची जीवनज्योत फुलविण्यासाठी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या वतीने ३० आॅगस्ट रोजी पुण्यात जनजागृती महाअभियान रॅली निघणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते राहुल सोलापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आदी मान्यवर रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. याबाबत माहिती देताना बी. जे. मेडिकल महाविद्यालय व ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना जगण्याची संधी मिळू शकते. मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या शरीरात जिवंत राहू शकतो; मात्र याबाबत आपल्या देशात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.’’डॉ. चंदनवाले पुढे म्हणाले, ‘‘सध्या देशात सुमारे ५ लाख मूत्रपिंड, ५० हजार यकृत आणि २ हजारांहून अधिक हृदय विकारांनीग्रस्त रुग्ण असून, या रुग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्तशुद्धीकरण हा पर्याय आहे; मात्र यकृत, हृदय, फुफ्फुसविकार यांनी ग्रस्त असणाऱ्यांना नवीन अवयव प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाची जाणीव आणि माहिती झाल्यास त्यांची अवयवदानासाठी सहज संमती मिळू शकेल व अनेकांना जीवदान मिळेल.’’ससून रुग्णालयातर्फे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांबरोबरच गणेश मंडळांनाही आपापल्य स्तरावर जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. याबरोबरच बी. जे. मेडिकलमधील प्राध्यापकांचे गट करण्यात आले असून, शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे. झेटटीसीसीच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून पुण्यात १५० रुग्ण यकृताच्या आणि २७५ रुग्ण किडनी दात्यांच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे विभागामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली व पुणे या शहरांचा समावेश आहे. पुढील काळात प्रतीक्षा यादीमध्ये भर पडू नये, यासाठी पुणेकर नागरिकांनी अवयवदानाचा विचार करावा. व्यक्ती ब्रेनडेड असेल, तर तिचे किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस व स्वादुपिंड यांचे दान करता येऊ शकते. आणि व्यक्ती ब्रेनडेड न होता इतर कारणांनी मृत घोषित झाला असेल, तर ४ तासांच्या आत त्या व्यक्तीचे त्वचा, डोळे, हाडे दान करता येऊ शकतात, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शहरातील सहा मुख्य भागांत महाफेरी - महाअभियानांतर्गत ३० आॅगस्टला शहरातील सहा मुख्य भागांतून महाफेरीचे आयोजन केले आहे. संचेती हॉस्पिटल चौक, वाडिया कॉलेज, आझम कँपस, शनिवारवाडा, पूलगेट बसस्टँड व सेव्हन लव्ह चौक या ठिकाणांहून या रॅलीला सुरुवात होणार आहे. - ३१ आॅगस्ट रोजी कार्यशाळा, अवयवदान चर्चासत्र, चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात येतील, तर १ सप्टेंबर रोजी महा अवयवदान अभियान नोंदणी शिबिराचे उद्घाटन होऊन आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात येईल. नोंदणी झालेली माहिती राज्यशासनाला पुरविली जाईल, असेही डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. - अधिक माहितीसाठी नागरिकांनी १८००२७४७४४४ व १८००११४७७० या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा आॅनलाइन नोंदणीसाठी www.dmer.org व  www.ztccmumbai.org  या वेबसाइटवर फॉर्म भरावा, असे आवाहन डॉ. चंदनवाले यांनी केले आहे.