शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीच्या बसथांब्याला ट्रक धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST

हडपसर : सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकातील वाहतूक शाखेसमोर बीआरटीच्या बसथांब्याला ट्रक धडकून अपघात झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडली. ...

हडपसर : सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकातील वाहतूक शाखेसमोर बीआरटीच्या बसथांब्याला ट्रक धडकून अपघात झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्वारगेट-हडपसर दरम्यान बीआरटी मार्गच शिल्लक राहिला नाही, तर बसथांबे अद्याप रस्त्याच्या मधोमध का ठेवले आहेत. सामान्य नागरिकांचे बळी घ्यायचे आहेत का, हडपसरवासीयांना सुरळीत जीवन जगू द्यायचे नाही का, असे एक ना अनेक प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

हडपसर-स्वारगेट दरम्यान बीआरटी मार्ग अवघा अर्धा किमी आणि बसथांबे रस्त्याच्या मध्येच शिल्लक आहेत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारही केल्या आहेत. मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आणखी किती वाहनचालकांचे बळी गेल्यानंतर प्रशासन अडथळा ठरणारे बसथांबे आणि बीआरटी मार्ग काढणार आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

मगरपट्टा चौकातून स्वारगेटकडे जातानाच्या बीआरटी दुभाजकावर फक्त बीआरटी बसेससाठी असा फलक लावला आहे. फातिमानगर चौक ते रामटेकडी आणि वैदूवाडी चौक ते मगरपट्टा चौक दरम्य़ानचा बीआरटीचे दुभाजक काढून टाकले. दरम्यानच्या काळात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पुढील काही कामे अर्धवट राहिली आहेत. हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गावरील अडथळा ठरणारे बीआरटीचे बसथांबे आणि बीआरटी मार्ग काढून वाहतुकीलाठी मार्ग खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बीआरटी मार्ग अन् बसथांबे धोक्याचे

बसथांबे रस्त्यात आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना वाहनाच्या गर्दीमुळे बसथांब्यावर जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. याबाबत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतरही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून बीआरटी मार्ग आणि बसथांबे नागरिकांसाठी धोक्याचे आहेत, हे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, अद्याप त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणीही का पुढाकार घेत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

फोटो : सोलापूर रस्त्यावर वैदूवाडी चौकातील वाहतूक शाखेसमोर बीआरटीच्या बसथांब्याला शनिवारी ट्रक धडकून अपघात झाला.