शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदवणे घाटात ट्रक कोसळला

By admin | Updated: August 13, 2014 04:43 IST

सासवडहून उरुळी कांचनकडे रासायनिक खते घेऊन निघालेला ट्रक सकाळी ६ वाजता शिंदवणे घाटात उलटला. दोन तासानंतर चालकाची यशस्वी सुटका करण्यात आली

राजेवाडी : सासवडहून उरुळी कांचनकडे रासायनिक खते घेऊन निघालेला ट्रक सकाळी ६ वाजता शिंदवणे घाटात उलटला. दोन तासानंतर चालकाची यशस्वी सुटका करण्यात आली. ट्रक क्र . एम.एच. १२ डी. ओ. ७०४८ घाटातील बापदेव मंदिरापासून तीव्र उतारावरून येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने खालून येणाऱ्या २० फूट खोल रस्त्यावर जोरदार आदळल्याने ट्रकचा चक्काचूर झाला. या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. रस्त्यावरील स्थानिक प्रवाशांनी त्याला तत्काळ दवाखान्यात हलविले. मात्र, या अपघातात ट्रकचालक अडकला. अपघाताची माहिती कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी अ‍ॅम्ब्युलन्स व दोन क्रेन पाठवून दिले. दोन तासाने चालकाची सुटका झाली. अ‍ॅम्ब्युलन्सने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ड्रायव्हरला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष जगदीश महाडिक, पोलीस पाटील पोपट पाटील यांनी प्रयत्न केले.वारंवार शिंदवणे घाटात अपघात होत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने सचित्र प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, पुरंदर पंचायत समिती सदस्या गौरी कुंजीर, उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील कांचन पाटील, शिंदवणचे उपसरपंच गणेश महाडिक, जगदीश महाडिक, तुकाई देवस्थानचे अध्यक्ष कांचन मचाले यांच्यासह उरुळी कांचन, शिंदवणे, वळती, वाघापूर, राजेवाडी परिसरातील नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी घाटात घाटाचे काम सुरू केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना गंभीर घटनांबाबत इशाऱ्याचे निवेदन दिले होते. मात्र, घाटात फक्त रुंदीकरणाचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे.