शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सुपे-मेडद गटात तिरंगी लढत

By admin | Updated: February 13, 2017 01:27 IST

तालुक्यातील सुपे परगण्यातील लढत यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. सध्या सुपे-मेडद

बारामती : तालुक्यातील सुपे परगण्यातील लढत यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत लक्षवेधी ठरणार आहे. सध्या सुपे-मेडद गटातील सुपे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपासह अपक्ष उमेदवाराच्या तिरंगी लढतीचे चित्र आहे. सोमवारी (दि. १३) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळी या गणातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.सुपे मेडद गट जिरायती भागातील परिसर आहे. सुपे परगणा म्हणून या भागाला ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला याच गणामध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी विद्यमान पंचायत समिती सदस्या मालन ज्ञानेश्वर कौले निवडून आल्या होत्या. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कौले यांच्या त्या पत्नी आहेत.मागील निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा या गणातील लढत प्रतिष्ठेची केली आहे.यंदा गण ओबीसी महिला राखीव आहे. भाजपाच्या वतीने पुन्हा विद्यमान सदस्या कौले यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नीता संजय बारवकर यांना सुपे गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काळखैरेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या मोहिनी गणेश खैरे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सध्या तरी या गणामध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने या गणातील लढतीवर राष्ट्रवादीने चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. अपक्ष उमेदवाराने अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)