पुणे : जमीन मालाकाची व शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता २१ झाडांची कत्तल करणाऱ्या चौघांना राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने दुप्पट झाडे लावण्याची शिक्षा दिली आहे. या शिवाय, चौघांना न्यायाधीकरणाने १५ हजारांचा दंड व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रूपये देण्याचा आदेश दिला आहे. राजेंद्र देवराव मारणे, सागर राजेंद्र मारणे, सुनील सदानंद मारणे, चंद्रकांत मारणे (चौघेही रा. आंदगाव, ता. मुळशी) अशी या चार आरोपींची नावे आहेत. न्यायाधिकरणाचे न्यायाधीश यु. डी. साळवी आणि न्यायाधीश डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.याचिकाकर्ते दीपक किसनराव मारणे (वय ३४, आंदगाव, ता. मुळशीे) यांनी याप्रकरणी चौघांबरोबरच पौड पोलीस ठाणे, मुळशी वनअधिकारी, तहसिलदार यांना प्रतिवादी केले होते. दि. ५ नोव्हेंबर आणि ९ नोव्हेंबर २०१४ रोजी मारणे यांच्या शेतातील २१ झाडे तोडण्यात आली होती. याबाबत विविध ठिकाणी याचिकाकर्त्याने दाद मागितली़ दाद न मिळाल्याने त्यांनी हरित न्यायाधीकरणात धाव घेतली. त्याच्याविरूध्द न्यायाधीकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पौड पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. काही महिन्यांनी चौघांना अटक केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, या चौघांनी तोडलेल्या एकवीस झाडांच्या बदल्यात मुळशी वनक्षेत्रपालाच्या निगरानी खाली ४२ झाडांची लागवड करून त्याचे तीन वर्षे संगोपन करावे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता २१ झाडांची कत्तल १५ हजारांचा दंड व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार रूपये देण्याचा आदेशदाद न मिळाल्याने त्यांनी हरित न्यायाधीकरणात धाव घेतली.
झाडे तोडली; आता दुप्पट लावा
By admin | Updated: November 28, 2015 00:58 IST