शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बीएएमएस डॉक्टरकडून उपचार होणे गैर नाही

By admin | Updated: October 24, 2014 05:12 IST

उपचार करणारे डॉक्टर हे बीएएमएस असून, त्यांना अ‍ॅलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरून विमा कंपनीने क्लेम नाकारला होता.

पुणे : उपचार करणारे डॉक्टर हे बीएएमएस असून, त्यांना अ‍ॅलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरून विमा कंपनीने क्लेम नाकारला होता. वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त असतानाही चुकीच्या पद्धतीने विमा नामंजूर केल्याने विमा कंपनीने तक्रारदाराला ३७ हजार ८२९ रुपये देण्याचा ग्राहक मंचाने आदेश दिला. विलास शिवाजी खंडागळे (मु. पो. उरुळी कांचन, तुपे वस्ती, ता. हवेली) यांनी दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे, पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. खंडागळे व त्यांच्या पत्नी हे निसर्ग उपचार आश्रम ट्रस्ट, उरुळी कांचन येथे २००० पासून कायमस्वरूपी स्वयंपाकी विभागात काम करीत आहेत. त्यांच्या संस्थेने कामगार व त्यांच्या कुटुंबाची ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी काढलेली आहे. ही पॉलिसी १२ वर्षांपासून असून, दर वर्षी नूतनीकरण केले जाते. दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाला म्हणून जुलै २०१२ मध्ये खंडागळे हे शेतीच्या कामासाठी सोलापूर येथील माढा गावी गेले होते. त्या वेळी त्यांना माढा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या उपचाराचा खर्च मिळविण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून बिलाच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी निसर्ग आश्रम ट्रस्टतर्फे मेडिक्लेमसाठी अर्ज केला. मात्र, ओरिएंटल कंपनीने खंडागळे यांनी ज्या डॉक्टराकडे उपचार घेतले ते डॉक्टर बीएएमएस असून, त्यांना अ‍ॅलोपॅथिक उपचार करण्याचा अधिकार नाही, या कारणावरून २९ हजार ८२९ रुपयांचा क्लेम नामंजूर केला. मात्र, खंडागळे यांनी राज्य शासनाचे राजपत्र दाखल केले. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २५ नोव्हेंबर १९९२पासून महाराष्ट्र प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट, १९६१ लागू केलेला असून, सर्व बीएएमएस डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक उपचार व औषधांचा वापर करण्यास परवानगी दिलेली आहे. हे कागदपत्र जोडलेला असतानाही क्लेम नाकारला. (प्रतिनिधी)