शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत प्रवाशांचं दिवाळं

By admin | Updated: October 28, 2016 04:30 IST

दिवाळसणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेऱ्या वाढवतानाच प्रवाशी भाड्यात वाढ करून ऐन दिवाळीत

बारामती : दिवाळसणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेऱ्या वाढवतानाच प्रवाशी भाड्यात वाढ करून ऐन दिवाळीत दिवाळं काढणारी ‘दिवाळी भेट’ देऊ केली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून किमान २५-३० टक्क्यांची वाढ केली आहे. बारामती आगाराने जादा गाड्यांची सोय केली आहे. फेऱ्यांची सं्ख्या दुप्पट केली आहे. सुरक्षीत प्रवासासाठी एसटीचा पर्याय प्रवाशी निवडतात. मात्र, १४ नोेव्हेंबर पर्यंत जादा भाड्याची आकारणी होणार असल्याने प्रवाशी वर्गात नाराजी आहे. दिवाळी निमित्त नोकरदार, कामगारवर्ग, शाळा. महाविद्यालयांना सुटी असते. या दरम्यान प्रवाशी संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ झालेली असते. त्यामुळे सहाजिकच एसटीवर प्रवाशांचा भार वाढतो. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांकडून एसटी बसलाच पसंती दिली जाते. मात्र राज्य परिवहन विभागाच्या वाढीव दराच्या निर्णयामुळे सर्वसमान्य प्रवासीवर्गाच्या खिशाला फटका बसणार आहे. राज्य परिवहन विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. यामध्ये दि. २२ ते दि. २४, दि. २८ ते दि. २ नोव्हेंबर, दि. ५ ते दि. ६ व दि. १२ ते दि. १४ नोव्हेंबर या तारखांना ही भाडेवाढ आकारण्यात येणार आहे.१२८ अधिक बस सोडणार दि. २५ ला ६० जादा बस तर दि. २६ ते १ नोव्हेंबर पर्यंत १२८ जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर बारामती आगारातून दिवाळी काळात शिर्डी, सोलापूर, सांगली, माहूरगढ, दादर, बोरीवली, तुळजापूर यामार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती बारामतीचे आगारप्रमुख आर. डी. मोरे व सहायक वाहतूक निरिक्षक आय. एम. सय्यद यांनी दिली. शाळा, महाविद्यालयांना सुटया लागण्याने गाड्यांचा वापर सणाच्या काळात होणार आहे.