शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवस्थापनामुळेच कचरा प्रकल्प अडचणीत

By admin | Updated: March 29, 2017 02:51 IST

महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १३ मोठे व २५ छोटे प्रकल्प खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिले आहेत

पुणे : महापालिकेकडून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १३ मोठे व २५ छोटे प्रकल्प खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिले आहेत. या कंपन्यांकडून करारातील तरतुदीनुसार शास्त्रीय पद्धतीने हे प्रकल्प चालविले जात नसल्याने प्रचंड दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. प्रशाासनाकडून या प्रकल्पांवर योग्य ती देखरेख ठेवण्यात येत नसल्यामुळेच या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला आहे.बाणेर येथील कचरा प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे शहरातील एकंदरीतच कचरा प्रकल्पांचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरात तयार होणाऱ्या १५०० टन कचऱ्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे, तर उर्वरित ५०० टन कचरा हा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो. प्रचंड दुर्गंधी व त्यातून निर्माण होणारे आरोग्यास घातक असणारे वायू यामुळे प्रकल्पांना नागरिकांचा विरोध होत आहे. वर्तक उद्यान व विश्रामबागवाडा येथील कचरा प्रकल्प नागरिकांच्या विरोधामुळे स्थलांतरित करावे लागले.आरोग्य धोक्यातबाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये १५० टन ओल्या कचऱ्यापासून त्याची मळी तयार केली जाते. ही मळी तळेगाव येथील प्रकल्पावर नेऊन त्यापासून सीएनजी गॅस तयार केला जात आहे. कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करण्याचा अत्यंत अभिनव असा हा उपक्रम आहे. मात्र बाणेर येथे प्रकल्पात शास्त्रीय पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने त्यातून दुर्गंधी व आरोग्यास हानिकारक वायू तयार होण्याची समस्या निर्माण होत आहे. एक महिन्यात सुधारणा करण्याचे आश्वासनबाणेर येथील कचरा प्रकल्पातून येणारी दुर्गंधी व इतर बाबींमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यानुसार या सुधारणा न झाल्यास त्याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल. आमचा कोणत्याही कचरा प्रकल्पाला विरोध नाही, तर कचरा प्रकल्प योग्य पद्धतीने चालविले जावेत, ही आमची मागणी आहे.- मेधा कुलकर्णी, आमदारदुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजनाबाणेर येथील कचरा प्रकल्पामध्ये ओला कचरा साठविला जात नाही. केवळ तो त्या प्रकल्पात करून त्याची सरी तळेगावला नेली जाते. तिथे दुर्गंधी होऊ नये, यासाठी पत्रे बसविणे व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. कचरा प्रकल्पांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रशासन आग्रही आहे.- सुरेश जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख