लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याच्या दिशेने येणारा एक कंटेनर खंडाळा एक्झीटजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटून उलटला. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती़ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़खंडाळा महामार्ग व लोणावळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने घाट चढून येत असताना कंटेनरच चालकाचे गाडीवरील ताबा सुटला. खंडाळा एक्झीटजवळ हा कंटेनर उलटला़ यामध्ये इंजिनमधून आॅईल रस्त्यावर सांडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ पोलिसांनी वाहतूक थांबवली होती. कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती़ सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही़ सांडलेल्या आॅईलवर माती टाकत दोन क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे काही काळ हाल झाले. अपघात झाल्याने वाहतूककोंडी होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)ट्रक व कंटेनरचा अपघात ४वडगाव मावळ : येथील वडगाव-तळेगाव दाभाडे फाटा येथे शनिवारी पहाटे जुना पुणे मुंबई महामार्गावर ट्रक व कंटेनर यांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे एक तास वाहतूक कोंडी झाली.४चालक महमंद मैनुद्दीन इमामुद्दीन गुफरोश (वय २५ रा. ठाणे) हा केए ३९, ४०८१ क्रमांकाचा कंटेनरमध्ये भिवंड ठाणे येथुन प्लॉस्टिक गोळ्या घेऊन कंटेनर मुंबई पुणे महामार्गावरुन हैद्राबादकडे जात होता. ४कंटेनर वडगाव-तळेगाव दाभाडे फाटा येथे आला असता अचानक ट्रक (एमएच १४ बीजे ११२५) कंटेनरला समोरासमोर धडकला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
खंडाळा एक्झिटजवळ वाहतूककोंडी
By admin | Updated: January 25, 2015 00:09 IST