शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘वाहतूक सल्लागार’ उरली कागदावरच

By admin | Updated: October 14, 2015 03:38 IST

शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे

पुणे : शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. या समितीची शेवटची बैठक १३ आॅक्टोबर २०१३ रोजी झाली होती. त्यानंतर पुढील बैठकीला मुहूर्तच मिळालेला नाही.सततच्या वाहतूककोंडीमुळे पुणेकर हैराण झाले असताना, या समस्या सोडविण्यासाठी असलेले व्यासपीठच बंद असल्याने शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या आदेशानुसार, नेमण्यात आलेल्या या समितीच्या बैठका प्रत्येक तीन महिन्याला होणे आवश्यक असताना; दुसरीकडे प्रशासनाला या समितीचाच विसर पडला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरातील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दरवर्षी तब्बल २ ते अडीच लाख नवीन वाहने रस्त्यावर येत येतात. त्यातच रस्ते अरुंद असल्याने सकाळी आणि सायंकाळी शहरात रस्त्याने चालणेही अवघड बनले आहे. त्याची दखल घेत, राज्य शासनाने शहरातील रिक्षा संघटना, पादचारी संघटनांचे प्रतिनिधी, पीएमपी, एस.टी., खासगी बस वाहतूक, मालवाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस, पालिका वाहतूक नियोजन विभाग यांची वाहतूक सल्लागार समिती नेमली होती. त्याच्या अध्यक्षपदी पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली होती. या समितीच्या नेमणुकीनंतर त्यांच्या नियमित बैठका होत होत्या. १३ आॅक्टोबर २०१३ नंतर गेल्या दोन वर्षांत या समितीची एकही बैठक झालेली नाही. विशेष म्हणजे ही बैठक घेण्याबाबत या संघटनांच्या प्रतिनिधींनी वारंवार पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करूनही ती घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.