शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पारदर्शक कारभारासाठी कारभारी बदला : तावडे

By admin | Updated: February 17, 2017 04:35 IST

पुणे जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्यांनी खोटे बोलून जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी विकासकामे केली नाही. पारदर्शक

मंचर : पुणे जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे सत्तेत बसलेल्यांनी खोटे बोलून जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी विकासकामे केली नाही. पारदर्शक कारभारासाठी पुणे जिल्हा परिषदेचे कारभारी बदला, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.तावडे यांची मंचर येथे गुरुवारी जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे, उमेदवार ताराचंद कराळे, वैशाली बाणखेले, संजय थोरात, कैलास राजगुरव, संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले आदी उपस्थित होते.तावडे म्हणाले, की सत्तेचा गैरवापर करणारांची आता गय केली जाणार नाही. विरोधकांच्या सभेला आलेल्यांना बदली करण्याची धमकी दिली जाते. चौकशी करू असे सांगितले जाते. अशी धमकी ज्यांना मिळाली आहे; त्यांना आम्ही बढती देऊ, असे आश्वासन देत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत सत्तेत असताना जो भ्रष्टाचार केला, त्या भ्रष्टाचाराची चौकशी आपला अध्यक्ष झाल्यावर करू, असे शेवटी सांगितले. ते पुढे म्हणाले, की आढळराव पाटील, वळसे पाटील यांनी बैलगाडा शर्यतीसाठी काहीच केले नसल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. आचारसंहिता संपली की शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटून शर्यती सुरू करू.या वेळी जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, तालुकाध्यक्ष जयसिंग एरंडे यांचीही भाषणे झाली.