शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगंधर्व’चा वर्षभरात कायापालट

By admin | Updated: June 27, 2017 07:57 IST

पुलंच्या पुढाकाराने आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे ५० वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. अनेक कलाकारांनी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुलंच्या पुढाकाराने आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे ५० वर्षांपूर्वी उद्घाटन झाले. अनेक कलाकारांनी या रंगमंचावर कारकीर्द घडवली आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. रंगमंदिराने अनेक कलाकारांना जन्म दिला. चोखंदळ पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यावर नाटकांना जागतिक उंची प्राप्त झाली. बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेतर्फे कलाकारांच्या खोल्या, कलादालन, ध्वनिव्यवस्था, बैठकव्यवस्था, स्वच्छतागृहे आदी सुविधांच्या माध्यमातून पुढील वर्षभरात रंगमदिराचा कायापालट केला जाणार आहे. या सुविधांच्या माध्यमातून रंगमंदिर कलाकार आणि प्रेक्षकाभिमुख करण्यावर भर दिला जाईल,’ अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.पुणे महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी आणि व्यवस्थापक मनोहर कुलकर्णी (अण्णा) यांना बालगंधर्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे उपस्थित होते. या वेळी टिळक बोलत होत्या. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फय्याज हुसेन खाँ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर तसेच आदित्य माळवे, ज्योत्स्ना एकबोटे, छाया मारणे, अजय खेडकर आदी नगरसेवक उपस्थित होते.या वेळी यश रुईकर (पुरुषोत्तम करंडक विजेता), विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), अस्मिता चिंचाळकर (अभिनय आणि गायन) आदी संगीत आणि गद्य मराठी रंगभूमीची सेवा केलेल्या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला.माधव वझे यांनी रंगभूमीवरील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मनोहर कुलकर्णी आणि नाना रायरीकर ही राम-लक्ष्मणाची जोडी होती. या जोडीने अनेक संस्थांच्या नाट्यव्यवस्थापनाची धुरा सांभाळली. मनोरंजन नाट्यसंस्था हा मराठी रंगभूमीचा नारायण होता. अण्णांनी सर्व जीवन रंगभूमीसाठी अर्पण केले आणि कलाकारांना अखंडपणे साथ दिली. बरेचदा आमची थकबाकी असूनही ते आम्हाला नाटकासाठी सामान उपलब्ध करून देत असत. महानगरपालिकेने अण्णांचा योग्य वेळी सन्मान केला आहे.’ महानगरपालिकेने प्रायोगिक रंगमंचावरील नाटकांना वर्षातून एकदा सन्मानित करून, कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि सांस्कृतिक उपक्रम राबवताना कलाक्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले.