शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बदलीचे नाट्य जिल्हा परिषदेतही

By admin | Updated: October 28, 2015 23:53 IST

जिल्हांतर्गत समायोजनच्या बदल्यांमध्ये मुळशी तालुक्यातील ‘त्या’ तीन शिक्षिकांच्या बदलीचे नाट्य आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनातही रंगले

पुणे : जिल्हांतर्गत समायोजनच्या बदल्यांमध्ये मुळशी तालुक्यातील ‘त्या’ तीन शिक्षिकांच्या बदलीचे नाट्य आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनातही रंगले. मात्र, प्रशासनाची भूमिका समजून घेतल्यानंतर घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत त्या शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात तेथेच रुजू होण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले.माण शाळेसाठी दोन व भूकुमसाठी एका शिक्षिकेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्या स्वाक्षरीने थेट नियुक्ती आदेश एक महिन्यापूर्वीच (२४ सप्टेंबर २०१५) देण्यात आले होते. मात्र, त्या शिक्षिकांना आता मान व भूकुमऐवजी शिंदेवाडी, उरावडे व भरे येथील शाळांवर पंचायत समिती प्रशासनाने तात्पुरती नियुक्ती दिली आहे. याबाबतचे नाट्य सुरू आहे. ‘त्या’ गेल्या महिनाभरापासून पंचायत समितीत बसून आहेत. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी याची दखल घेत मुळशीच्या गटविकास अधिकारी व सभापतींना तातडीने जिल्हा परिषदेत बोलवून घेतले. याचा त्यांना जाब विचारला. जर जिल्हा परिषदेने तसे आदेश दिले असताना तुम्ही परस्पर बदल कसे केले. याबाबत गटविकास अधिकारी शालिनी कडू यांनी अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडली. मुळशीत सध्याच्या परिस्थितीत ६८ शिक्षक कमी आहेत. जिल्हा परिषदेने आम्हाला फक्त तीन शिक्षक दिले. ते शिक्षकही थेट नियुक्ती आदेशाने मिळाले. त्यामुळे आम्ही पंचायत समितीच्या बैठकीत चर्चा करून त्या तीन शिक्षकांना ज्या शाळा सध्याच्या परिस्थितीत शिक्षकांअभावी बंद आहेत. त्या शाळा देण्याचे ठरले. जेव्हा इतर शिक्षक मिळतील तेव्हा त्यांना पुन्हा मिळालेल्या शाळा दिल्या जातील, असे ठरवले. हे स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी शैैक्षणिक अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये हा हेतू असल्याने ‘त्या’ तीन शिक्षकांना प्रशासनाने दिलेल्या शाळांवर तात्पुरत्या स्वरूपात काम करावे, असे सांगितले. याबाबत मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांच्याशी संपर्क साधला असता, शैैक्षणिक अडचण व मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिक्षक मिळाल्यानंतर त्यांना दिलेल्या शाळा पुन्हा दिल्या जातील, असे सांगितले. (प्रतिनिधी)