शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे होतेय वाहतूककोंडी

By admin | Updated: October 15, 2016 05:40 IST

खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली

चंदननगर : खराडीतील हॉटेल रॅडिसन चौकात सतत रस्त्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाली आहे. खराडीतील प्रभाग क्रमांक १९च्या मुख्य चौकात रस्त्यात कचरा गेल्या वर्षभरापासून टाकला जात आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना, व्यावसायिकांना होत आहे. खराडीतील चौकातून चंदननगरला जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात बेजबाबदार नागरिकांकडून रात्रीच्या वेळी हा कचरा टाकला जात आहे.या चौकात सततच्या वाहतूककोंडीमुळे दोन महिन्यांपूर्वी सिग्नल बसविण्यात आले आहेत. तरी सुद्धा याठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याच चौकातून हडपसर, खराडी एमआयडीसी, आयटी पार्ककडे रस्ता जातो. त्यामुळे मोठी वाहतूक या रस्त्यावरून होत असते. बायपास ते हडपसर हा मुख्य रस्ता मोठा आहे. मात्र खराडी ते चंदननगर हा रस्ता केवळ तीसच फुटी असल्याकारणाने या रस्त्यावर मात्र कचरा टाकला जात आहे. तीस फुटाच्या रस्त्यात दहाहून अधिक फूट कचरा पडलेला असतो. त्यामुळे खराडी ते चंदननगरच्या बाजूच्या वाहनांना रस्ताच उरत नाही. त्यामुळे ती वाहने चुकीच्या व आडव्या तिडव्या पद्धतीने घातल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. वाहनचालकांत दररोज वाद होत आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील कचरा मध्यरात्री टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता तो उचलला जाते. मात्र त्याठिकाणी स्वच्छता न केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याबाबत महापालिका आरोग्य विभागाला वारंवार कळवूनही पालिकेचे आरोग्य अधिकारी या तक्रारींची दखल घेत नसल्यामुळे चौकाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. या चौकात अतिशय सुंदर मोठे प्रशस्त रस्ते, थ्री स्टार, फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल आहेत. मात्र या कचराकुंडीमुळे चौकाची शोभा गेली आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले की दुर्गंधी असह्य होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात कचरा उचलण्यासाठी जे मोठे ट्रक आहेत ते कमी असून, ५ बीआरसी, १७ घंटागाड्या, कंटेनर ठेवण्यासाठी ४ डीपी टेम्पो असून, यातील १७ घंटा गाड्या सतत नादुरुस्त असतात. दहा ते पंधरा वर्षांपूर्वीच्या या गाड्या असल्यामुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वडगावशेरी व खराडीतील कचरा नियोजन कोलमडले आहे.(वार्ताहर)