शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भिशीच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला अटक (नवीन)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : भिशीच्या नावाखाली ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक करून ९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : भिशीच्या नावाखाली ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असणाऱ्या बापलेकास पाकिस्तान सीमारेषा भुज, कच्छ (गुजरात) येथे जाऊन लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले. गेल्या वर्षभरापूर्वी जवळपास ५०० जणांना या बापलेकांनी भीशीच्या नावाखाली गंडा घालून फरार झाले होते.

भरतकुमार चरणदास जोशी व त्यांचे मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी (रा. सहयोगनगर, भुज, कच्छ, गुजरात) अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर अंतर्गत सन २०१३ ते सन २०१९ या कालावधीमध्ये ऊरुळी कांचनमधील एल. सी. जोशी ॲन्ड कंपनी, हिरेन ट्रेडिंग कंपनी, ओंकार ट्रेडर्स व दीपक टी सप्लायर्स या कंपनीचे मालक भरतकुमार चरणदास जोशी व त्यांची मुले दीपक भरतकुमार जोशी, हिरेन भरतकुमार जोशी यांनी फिर्यादी व इतर एकूण ११ जणांना ७ वर्षांच्या कालावधीवर मुदतीवर, आकर्षक रक्कम परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेच्या खात्यावरून व आर.टी.जी.एस.ने रक्कम घेऊन त्यांना कसल्याही प्रकारचा आकर्षक परतावा परत न देता तसेच त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत न देता त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली.

काही लोकांची लिलावाच्या भिशीच्या नावाने पैसे धनादेशाद्वारे तसेच रोखीने घेऊन त्यांना परत न देता त्यांची सुध्दा अशी एकूण ३ कोटी ५९ लाख ९६ हजार १३० रुपयांची फसवणूक केली. यामुळे ज्ञानेश्वर नारायण काळभोर (रा. धुमाळ मळा रोड, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २५ सप्टेंबर २०२० ला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी प्राथमिक तपास केल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा आणि पुणे ग्रामीणला सोपवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम व त्यानंतर पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपींचा शोधासाठी पथक गुजरात येथे दोन वेळा गेले, तर मुंबई येथेही त्यांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र, त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला. यानंतर या गुन्ह्याचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडे आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी आरोपीचे मूळ राहण्याचे ठिकाण, नातेवाईक, फिर्यादी यांचेकडे सखोल चौकशी केली. मिळालेल्या माहितीवरून पुन्हा पोलिसांचे पथक आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गेले. त्यांच्यावर तीन दिवस पाळत ठेवून ९ महिन्यांपासून फरार असेलेले आरोपी बाप-लेक भरतकुमार व त्यांची मुले दीपक व हिरेन यांना पाकिस्तान सीमारेषाजवळ भुज, कच्छ (गुजरात) येथून अटक केली. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ नम्रता पाटील, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक, अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, श्रीनाथ जाधव, अजिंक्य जोजारे, यांचे पथकाने

केलेली आहे.