मंचर : टोमॅटोच्या बाजारभावात वाढ होत नसल्याने टोमॅटो बागा उपटून टाकण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. भांडवल वाढू नये, यासाठी औषधफवारणी व खताची मात्रा देण्याचे बंद केले आहे. पंधरा दिवसांपासून बाजारभावात वाढ झालेली नाही. चांगले टोमॅटो एका क्रेटला १०० रुपयांना विकले जातात, तर थोडासा मध्यम लहान माल केवळ ५० रुपये क्रेट या भावाने विकला जातो. या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही. टोमॅटो पिकाला लागणारे भांडवल पाहता, उत्पन्न काहीच मिळत नाही. आता अधिक भांडवल गुंतविण्यास शेतकरी धजावत नाही. औषधफवारणीसाठी मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांनी आता औषधफवारणी करणे बंद केले आहे. तसेच, खताची मात्र दिली जात नाही. त्याद्वारे खर्चाची बचत करण्यास प्राधान्य दिले जात नाही. १०० रुपये एक क्रेट या भावाने टोमॅटोची विक्री झाली, तरी गाडीभाडे व इतर खर्च पाहता, शेतकऱ्याच्या हातात कहीच राहत नाही. (वार्ताहर)ज्या शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक अंतिम टप्प्यात आले आहे, त्यांनी टोमॅटोची तोडणी करणे सोडून दिले आहे. छोटा माल असल्यास त्याला बाजारात फारसे कोणी विचारत नाही. त्यामुळे तो माल तोडत नाहीत. शेतातील टोमॅटो पीक लवकर काढून दुसरे पीक घेण्याचा विचार शेतकरी करीत आहेत. त्यासाठी काही भागात टोमॅटो बागा उपटून टाकण्यास सुरुवात झाली आहे.
टोमॅटो बागाच उपटल्या
By admin | Updated: August 13, 2015 04:34 IST