शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

खेड, जुन्नर, आंबेगावच्या कारभारणींचा ‘लोकमत’तर्फे आज सत्कार

By admin | Updated: March 10, 2017 04:52 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याच्या कारभारणी बनलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद

पुणे : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून जिल्ह्याच्या कारभारणी बनलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती महिला सदस्यांचा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे गौरव करण्यात येणार आहे. हा सत्कार दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात शुक्रवारी खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील महिला सदस्यांचा तसेच आळंदी, जुन्नर, चाकण व राजगुरुनगर नगरपालिकेतील नगरसेविका अशा ७0 कारभारणींचा राजगुरुनगर येथील पंचायत समिती सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता गौरव सोहळा रंगणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत ७५ पैैकी ४0 व पंचायत समिती निवडणुकीत १५0 पैैकी ७१ अशा १११ महिला सदस्या विजयी झाल्या आहेत. सद्य:स्थितीत जुनेच सदस्य कारभार पाहात असून, १४ तारखेनंतर पंचायत समिती व २१ तारखेनंतर जिल्हा परिषद सदस्य सभागृहात प्रवेश करणार आहेत. लोकसेवेच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकत असलेल्या या महिलांच्या पंखांत शुभेच्छांचे बळ भरण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवेचे ब्रीद आणखी समर्थपणे पुढे नेता यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे ‘महिला सदस्यांचे अधिकार व कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकाही नुकत्याच झाल्या असून तेथील सभागृहातही महिला नगरसेविकांनी प्रवेश केला आहे. चाकण, आळंदी, राजगुरुनगर व जुन्नर नगरपालिकेतही सद्य:स्थितीत ४२ महिला नगरसेविका काम करीत आहेत. हे निमित्त साधून त्यांनाही सन्मानीत करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाची मागील जिल्हा परिषद निवडणुकीपासून (२०१२) अंमलबजावणी सुरू झाली. या निर्णयाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आहेत. सदस्या व नगरसेविका म्हणून महिलांचे पाणी, कचरा, आरोग्य आदी मूलभूत प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे त्या समजावून घेऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर गट, गणाच्या व प्रभागाच्या विकासामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. विकासाच्या परंपरेला नव्या कारभारणी पुढे घेऊन जाणार आहेत. त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याकरिता ‘लोकमत’च्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवनिर्वाचित महिला सदस्या व नगरसेवकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सत्काराचा स्वीकार करावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी म्हाळुंगे (इंगळे) येथील राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उज्वला वाळके व ग्रामपंचायत सदस्या कृतिका वाळके यांचा सहयोग लाभला आहे. (प्रतिनिधी)