शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

पालिकेच्या आर्थिक स्वायत्ततेचा आज फैसला

By admin | Updated: March 18, 2015 00:37 IST

महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आर्थिक कणा असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

पुणे : महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आर्थिक कणा असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याची घोषणा बुधवारी राज्याच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महापालिकेची आर्थिक स्वायत्तता कायमची संपुष्ठात येणार असल्याने महापालिकेचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. मेट्रो मार्गास केंद्रशासनाने १२६ कोटींच्या निधीचा बुस्टर डोस दिल्याने राज्यशासन किती निधी देणार याबाबतही महापालिकेसहा पुणेकरानांही उत्सुकता आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत सत्तेवर आल्यास राज्यातील एलबीटी हद्दपार करण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. त्यानुसार, मागील महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व कर रद्द करून 2016-17 पासून जीएसटी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, राज्यशासनानेही या अर्थसंकल्पात एलबीटी रद्द करण्याचे संकेत दिल आहेत. त्यामुळे याबाबत होणा-या घोषणेकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.अंदाजपत्रकाचा ३५ टक्के हिस्सा एलबीटीचा आघाडी सरकारने एप्रिल २०१३-१४ पासून एलबीटी लागू केला आहे. या कर प्रणालीमुळे जकातीमध्ये होणारे गैरप्रकार तसेच चोऱ्या रोखल्या गेल्याने महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडली. पहिल्या वर्षीच महापालिकेस एलबीटीमधून जवळपास १३२३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे २०१४-१५ च्या अंदाजपत्रकात या विभागास १४५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, हा कर रद्द करण्याच्या घोषणा झाल्याने या उत्पन्नात घट येऊन मागील ११ महिन्यांत केवळ ११५४ कोटी रुपये पालिकेच्या तजोरीत जमा झालेले आहेत. तर २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात पालिकेने एलबीटीमधून 1400 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. हा अंदाजपत्रकातील उत्पन्नाचा ३५ टक्के हिस्सा आहे. पुन्हा खेळत्या चलनावर गदा ४जकातीमधून महापालिकेस दररोज ४ ते ५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळायचे ते बंद झाल्या नंतर या खेळत्या चलनाची जागा गेल्या दोन वर्षांपासून एलबीटीने घेतली होती. दर महिन्याला १०० ते १२५ कोटींचे उत्पन्न मिळत होते. यातून कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच लहान-मोठ्या बिलांची तजवीज करणे सोपे होते. मात्र, आता एलबीटी रद्द झाल्यास उत्पन्नाचा पर्यायी स्रोत अद्याप जाहीर केलेला नाही. शासनाकडून मिळणारे उत्पन्न किती असेल याचीही माहिती नाही. शासनावर विश्वास कसा ठेवायचा ? दोन वर्षांपूर्वी जकात रद्द केल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावला होता. एप्रिल ते डिसेंबर 2014 या कालावधीत शासनाकडे १३६ कोटी रुपये जमा झाले आहेत. ते देण्याचे आदेश राज्य शासनाने नोव्हेंबर, डिसेंबर 2014 तसेच मागील आठवड्यातही काढले आहेत. मात्र, त्यातील एक छदामही अद्याप मिळालेला नाही. तसेच जेएनएनयूआरएम योजनेसह इतर काही योजनांचे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या पुढे एलबीटीचे अनुदान तरी वेळेत मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.