शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी अर्ज भरण्याची आज अखेरची मुदत

By admin | Updated: June 27, 2017 08:00 IST

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचे दोन्ही भाग भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत आहे. अद्यापही भाग १ साठी लॉगिन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचे दोन्ही भाग भरण्याची मंगळवारी अंतिम मुदत आहे. अद्यापही भाग १ साठी लॉगिन करूनही दोन्ही भाग अर्ज पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सहा हजार आहे. या विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण न भरल्यास त्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रात आवश्यक कागदपत्रे सादर करून अर्जात झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे, असे समितीकडून सांगण्यात आले.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकाक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत अर्जाचे दोन्ही भाग पूर्ण करण्याची अंतिम मुदत बुधवारी (दि. २७) दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरणे किंवा त्यात दुरुस्ती करता येणार आहे. मंगळवारअखेरपर्यंत ८५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी भाग १ साठी लॉगिन केलेले आहे. त्यापैकी ७१ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरून अर्ज पूर्ण केले आहेत. केवळ भाग १ पूर्ण केलेल्या परंतु अ‍ॅपु्रव्ह न केल्यामुळे भाग २ भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ हजार ४४० एवढी आहे. तसेच भाग २ मध्ये लॉगिन केलेल्या परंतु पसंतीक्रम भरून अर्ज पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७७२ आहे. भाग १ व भाग २ अ‍ॅप्रुव्हलसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अर्ज अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा या यादीत समावेश केला जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून ते अपूर्ण असल्यास माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या कोणत्याही मार्गदर्शन केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह जाऊन अर्ज अपु्रव्ह करून घ्यावा. पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळेत जाऊन अर्ज अ‍ॅप्रुव्ह करून घ्यावा, असे आवाहन समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी केले आहे.