लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रियेचा भाग १ व भाग २ भरणे व त्यापुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक दि. १४ जून, बुधवारी (आज) जाहीर केले जाणार आहे. या प्रक्रियेची विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यासाठी टाटा अॅसेंबली हॉल, वाडिया कॉलेज (रूबी हॉल शेजारी), राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल (सहकारनगर), कलमाडी हायस्कूल (कर्वे रोड) येथे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.राज्य मंडळाचा (एसएससी) दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आहे. केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश क्षमतेत वाढ झाली असून, एकूण २६७ महाविद्यालयांची एकूण ९४ हजार ५८० प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश अर्जाचा भाग पहिला भरण्यास दि. २५ मे ०१७ पासून सुरूवात झाली. आतापर्यंत ७१ हजार १९४ विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन भरले गेले आहेत, त्यापैकी २७ हजार ३९८ अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे. पडताळणी न झालेल्या अर्जांची संख्या १६ हजार ४६८ इतकी आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले जाणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली. अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ ते १२ या वेळेमध्ये वाडिया कॉलेजच्या टाटा हॉलमध्ये मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुसरा मार्गदर्शन वर्ग सहकार नगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये दुपारी १ ते २ या वेळेत पार पडणार आहे. तिसरा मार्गदर्शन वर्ग कर्वे रोड येथील कलमाडी हायस्कूलमध्ये दुपारी ३ ते ४ या वेळेत पार पडणार आहे. प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागणार आहे. आजपासून उद्बोधन वर्गकॅम्प/येरवडा : वाडिया कॉलेज१४ जून सकाळी ११ ते १२पर्वती/धनकवडी : राजीव गांधी स्कूल १४ जून दुपारी १ ते २कोथरूड : कलमाडी हायस्कूल१४ जून दुपारी ३ ते ४
आज अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार
By admin | Updated: June 14, 2017 03:59 IST